जोकोविच, नदाल दुसऱ्या फेरीत

By admin | Published: May 30, 2017 01:02 AM2017-05-30T01:02:28+5:302017-05-30T01:02:28+5:30

नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल यांनी पुरुष एकेरीत तर गर्बाइन मुगुरुजा, कॅरोलिन वोजानियाकी यांनी महिला एकेरीत आपापल्या

Djokovic, Nadal in second round | जोकोविच, नदाल दुसऱ्या फेरीत

जोकोविच, नदाल दुसऱ्या फेरीत

Next

पॅरिस : नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल यांनी पुरुष एकेरीत तर गर्बाइन मुगुरुजा, कॅरोलिन वोजानियाकी यांनी महिला एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सर्वियाच्या जोकोविचने स्पेनच्या मार्सेल ग्रेनोलर्सचा ६-३, ६-४, ६-२ असा पराभव केला. दुसरीकडे विक्रमी दहाव्या फ्रेंच ओपन विजेतेपदासाठी खेळत असलेल्या राफेल नदालने फ्रान्सच्या बेनोईट पियरीचा ६-१, ६-४,६-१ असा सहज पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महिला एकेरीत स्पेनच्या गर्बाइन मुगुरुजाने इटलीच्या फ्रान्सिस्का शियावोनला सरळ दोन सेटमध्ये ६-२, ६-४ असे नमविले. डेन्मार्कची ११वी मानांकित कॅरोलिन वोजनियाकीने आॅस्ट्रेलियाच्या जेमी फोरलिसचा ६-४, ३-६, ६-२ असा पराभव केला.

Web Title: Djokovic, Nadal in second round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.