जोकोविच विम्बल्डनमधून 'आऊट'
By admin | Published: July 2, 2016 10:42 PM2016-07-02T22:42:09+5:302016-07-02T22:45:29+5:30
आपल्या सुरेख सर्व्हिससाठी प्रसिद्ध असणाऱ्या सॅम क्वेरी याने विम्बल्डनमध्ये दोन वेळेसच्या गत चॅम्पियन आणि जगातील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याच्यावर तिसऱ्या फेरीत
४७ वर्षांत कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्याच्या आशेला तडा : सॅम क्वेरीचा खळबळजनक विजय
लंडन : आपल्या सुरेख सर्व्हिससाठी प्रसिद्ध असणाऱ्या सॅम क्वेरी याने विम्बल्डनमध्ये दोन वेळेसच्या गत चॅम्पियन आणि जगातील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याच्यावर तिसऱ्या फेरीत खळबळजनक विजय मिळवताना सर्बियाच्या या खेळाडूचे ४७ वर्षांत कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्याच्या आशेला तडा दिला.
जोकोविच २00९ फ्रेंच ओपननंतर एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत लवकर पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. काल पावसामुळे सामना थांबल्यामुळे आजदेखील दोन तास उशिरा झालेल्या सामन्यानंतर अमेरिकेच्या क्वेरीने जोकोविचवर ७-६, ६-१, ३-६, ७-६ असा विजय मिळवला. या पराभवामुळे जोकोविचचे ओपन युगात ग्रँडस्लॅममध्ये विक्रमी सलग ३0 विजयाची मालिकादेखील खंडित झाली आणि त्याचबरोबर तो सलग २९ व्या ग्रँडस्लॅम उपांत्यपूर्व फेरी गाठण्यापासूनही वंचित राहिला.
जगातील ४१ व्या क्रमांकावरील खेळाडू आणि २८ व्या मानांकित क्वेरीला उपांत्यपूर्व फेरीत आता फ्रान्सच्या निकोलस माहुत याच्याशी दोन हात करावे लागतील.