जोकोविच, सेरेना उपांत्य फेरीत

By admin | Published: June 3, 2016 02:26 AM2016-06-03T02:26:59+5:302016-06-03T02:26:59+5:30

दहा कोटी डॉलरच्या कमाईच्या आकड्याचा पल्ला पार करणारा जगातील पहिला टेनिसपटू आणि नंबर वन सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने गुरुवारी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत झेक

Djokovic, Serena in the semifinals | जोकोविच, सेरेना उपांत्य फेरीत

जोकोविच, सेरेना उपांत्य फेरीत

Next

पॅरिस : दहा कोटी डॉलरच्या कमाईच्या आकड्याचा पल्ला पार करणारा जगातील पहिला टेनिसपटू आणि नंबर वन सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने गुरुवारी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बेर्डीच याचा ६-३, ७-५, ६-३ असा धुव्वा उडवताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे महिलांच्या गटात अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने कजाखस्तानच्या युलिया पुतिनसेवाचा २-१ सेटमध्ये पराभव करून अंतिम चारमधील जागा निश्चित केली.
११ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचने त्याच्या कारकिर्दीत फक्त फ्रेंच ओपनचे अजिंक्यपद पटकावलेले नाही. जोकोविचने ६ वेळा आॅस्ट्रेलियन ओपन, ३ वेळा विम्बल्डन आणि २ वेळा यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे; परंतु फ्रेंच ओपनमध्ये त्याला २०११, २०१४ आणि २०१५ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.जोकोविचचा उपांत्य फेरीतील सामना १३व्या मानांकित आॅस्ट्रियाच्या डोमेनिक थिएमविरुद्ध होणार आहे. डोमिनिक थिएम याने १२व्या मानांकित बेल्जियमच्या डेव्हिड गोफीन याचा ४-६, ७-६, ६-४, ६-१ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने पहिला सेट गमावल्यानंतर जोरदार मुसंडी मारत कजाखस्तानच्या युलिया पुतिनसेवाचा ५-७, ६-४, ६-१ गुणांनी पराभव करीत महिला एकेरीत उपांत्य फेरी गाठली. हा सामना जिंकण्यासाठी सेरेनाला चांगलाच संघर्ष करावा लागला. सेरेनाची उपांत्य फेरीत हॉलंडच्या किकी बर्टेससोबत लढत होईल. किकी बर्टसने उपांत्यपूर्व फेरीत तिमिया बासिंस्ज्की हिचा ७-५, ६-२ असा सरळ सेटस्मध्ये पराभव केला.
लिएंडर पेसही
सेमी फायनलमध्ये
भारताचा अनुभवी स्टार टेनिसपटू लिएंडर पेस यानेदेखील मिश्र दुहेरीत सेमी फायनलमध्ये धडक मारली. आगामी १७ जूनला ४३ वर्षांचा होणाऱ्या लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस या अमानांकित जोडीने रशियाच्या एलेना वेस्निना आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस या पाचव्या मानांकित जोडीवर ६-४, ६-३ असा सनसनाटी विजय मिळवताना उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरीचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना मरे व वावरिंका यांच्यात खेळवला जाणार आहे. सेमीफायनलमध्ये तीन अव्वल खेळाडूंशिवाय टॉप टेनच्या बाहेर असणाऱ्या थिएमने आपला विशेष ठसा उमटवला आहे. २२ वर्षीय थिएम जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावर असून, त्याने प्रथमच ग्रॅण्डस्लॅममध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. त्याची ग्रॅण्डस्लॅममधील सर्वोत्तम कामगिरी २०१४च्या यूएस ओपनमध्ये होती. या स्पर्धेत त्याने चौथी फेरी गाठली होती.४जोकोविच ३0 व्यांदा ग्रँडस्लॅम सेमीफायनलमध्ये पोहोचला; परंतु २९ वर्षीय सर्बियन खेळाडूने तिसऱ्या सेटच्या दुसऱ्या गेममध्ये स्पर्धेतून बाद झालो असते हे मान्य केले.
४ब्रेक पॉइंट घेण्यात अपयश आल्याने त्रस्त झालेल्या जोकोविच त्याचे रॅकेट कोर्टवर मारू इच्छित होता; परंतु त्याच्या हातातील रॅकेट हातातून निसटून फिलिप चॅटरियर कोर्टच्या भिंतीवर आदळली. रॅकेट जवळ असलेल्या लाईन जजला लागली असती, तर जोकोविचला स्पर्धेतून बाद व्हावे लागले असते.
> सानिया मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत
भारताची सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियाची जोडीदार इव्हान डोडीग यांनी चिनी-तैपेईच्या युंग जान चान व बेलारुसच्या मॅक्स मिर्नी या जोडीचा गुरुवारी
६-१, ३-६, १०-६ असा चुरशीच्या लढतीत पराभव करताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत धडक मारली. द्वितीय मानांकित सानिया-डोडीग या जोडीला चान व मिर्नी या सातव्या मानांकित जोडीला पराभूत करण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला.

Web Title: Djokovic, Serena in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.