जोकोविचचा संघर्षपूर्ण विजय
By admin | Published: February 5, 2017 03:58 AM2017-02-05T03:58:54+5:302017-02-05T03:58:54+5:30
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविचला विजय मिळवण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. त्याच्या विजयामुळे सर्बियाने रशियाविरुद्ध डेव्हिस चषक
पॅरिस : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविचला विजय मिळवण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. त्याच्या विजयामुळे सर्बियाने रशियाविरुद्ध डेव्हिस चषक विश्व ग्रुप लढतीत २-० अशी आघाडी मिळवली.
आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये दुसऱ्याच फेरीत आव्हान संपुष्टात आलेल्या १२ वेळेसच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन जोकोविचने दानिल मेदवेदेव याचा ३-६, ६-४, ६-१ असा पराभव केला. त्याआधी जागतिक क्रमवारीतील ३७ व्या स्थानावरील व्हिक्टर ट्रोइकी याने ५२ व्या रँकिंगवाल्या कारेन काचानोव्ह याचा ६-४, ६-७, ६-३, १-६, ७-६ असा पराभव करीत सर्बियाला विजयी सुरुवात करून दिली.
या लढतीतील विजयी संघाचा सामना उपांत्यपूर्व फेरीत पाच वेळेसचा चॅम्पियन स्पेन अथवा क्रोएशियाशी होईल. स्पेन संघात १४ वेळेसचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदाल नाही. नदालने आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती.
(वृत्तसंस्था)