जोकोविचचा सनसनाटी पराभव; फेडरर विजयी

By admin | Published: August 9, 2014 12:29 AM2014-08-09T00:29:04+5:302014-08-09T00:29:04+5:30

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याला फ्रान्सच्या विल्फ्रेड सोंगा याच्याकडून टोरँटो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत 2-6, 2-6 असा सनसनाटी पराभव पत्करावा लागला,

Djokovic's sensational defeat; Federer won | जोकोविचचा सनसनाटी पराभव; फेडरर विजयी

जोकोविचचा सनसनाटी पराभव; फेडरर विजयी

Next
>टोरँटो : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याला फ्रान्सच्या विल्फ्रेड सोंगा याच्याकडून टोरँटो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत 2-6, 2-6 असा सनसनाटी पराभव पत्करावा लागला, तर 17 ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणा:या रॉजर फेडरर याने क्रोएशियाच्या मारिन सिलीच याचा 7-6, 6-7, 6-4 असा पराभव केला.
शुक्रवारी आपला 33वा वाढदिवस साज:या करणा:या फेडररने टोरँटोत चार वेळेस अंतिम फेरी गाठली आहे, तर दोन वेळेस त्याने विजेतेपद पटकावले आहे. जर फेडरर या वर्षी जिंकल्यास त्याचे कारकिर्दीतील 80 वे विजेतेपद ठरेल.
कॅनडात तीन वेळेस चॅम्पियन ठरलेला अव्वल मानांकित जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर सर्वच सातही स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यात इंडियन वेल्स, मियामी, रोम आणि विम्बल्डनचा समावेश आहे. विवाहबंधनात अडकल्यानंतर पहिली स्पर्धा खेळणारा जोकोविच त्याच्या पराभवाने खूप निराश झाला. कोर्टवर उतरण्याआधी जशा पद्धतीने खेळण्याचा विचार केला होता, त्याच्या जवळपासही मी खेळ करू शकलो नाही. खूपच वाईट दिवस आणि सुमार कामगिरी राहिली, असे त्याने म्हटले. तथापि, सोंगाने फक्त एकदाच अव्वल मानांकित खेळाडूला पराभूत केले नाही, तर त्याआधीही तीन वेळेस अव्वल मानांकित खेळाडूला पराभवाची धूळ चारली आहे. दरम्यान, पाचव्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररने क्रोएशियाच्या इव्हान डोडिगचा 1-6, 6-3, 6-3 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
जोकोविचशिवाय दुसरा मोठा सनसनाटी निकाल हा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्टेन वावरिंका हिच्या पराभवाने लागला. तृतीय मानांकित वावरिंका हिला द. आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने 7-6, 7-5 असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Djokovic's sensational defeat; Federer won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.