आनंदसाठी करो वा मरोची स्थिती

By Admin | Published: November 23, 2014 02:29 AM2014-11-23T02:29:08+5:302014-11-23T02:29:08+5:30

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे 1क् डाव झालेले आहेत आणि 6 व्या डावानंतर मिळालेली 1 गुणाची आघाडी, मॅग्नस कार्लसनने टिकवून ठेवली आहे.

Do it for fun or die | आनंदसाठी करो वा मरोची स्थिती

आनंदसाठी करो वा मरोची स्थिती

googlenewsNext
विश्व बुद्धिबळ : कार्लसनविरुद्ध एक विजय आवश्यक
जयंत गोखले - जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे 1क् डाव झालेले आहेत आणि 6 व्या डावानंतर मिळालेली 1 गुणाची आघाडी, मॅग्नस कार्लसनने टिकवून ठेवली आहे. आता शेवटच्या 2 डावांत कसा निकाल लागतोय, यावर पुढच्या स्पर्धेचे भवितव्य अवलंबून आहे. टायब्रेकमध्ये जाऊन जलदगती डाव खेळण्यासाठी आनंदला या 12 डावांच्या टप्प्यात गुणसंख्या समान करणो अनिवार्य आहे. अर्थात, यासाठी त्याला पुढच्या 2 डावांतून 1.5 गुण मिळवावे लागेल. 
11 व्या डावात काळी मोहरी घेऊन आनंदला खेळायचे आहे आणि माङया मते हा डाव आनंदची सत्वपरीक्षा बघणारा असेल. आनंदला या डावात पुन्हा एकदा बरोबरी साधता आली, तर त्याचे मनोधैर्य उंचावल्यास खूप मदत होईल आणि मग अखेरच्या डावात हुकमी प्रतिटोला देण्यासाठी आनंद सर्वार्थाने सज्ज होईल. त्यामुळे या क्षणी पुढच्या 2 डावांचा विचार न करता, आनंद व त्याच्या संघाचे फक्त उदयाच्या डावावर आपली सर्व शक्ती केंद्रित करणो गरजेचे आहे. 
या परिस्थितीचे दडपण जसे आनंदवर आहे तसेच कार्लसनवरदेखील असणार आहे. उदयाच्या 11 व्या डावात असणा:या पांढ:या मोह:यांचा पूर्ण उपयोग करून उदयाचा विजय मिळवण्यासाठी कार्लसन काटोकाट प्रयत्न करणार, हे उघड आहे. गेल्या 4 डावांतला आनंदचा उंचावत चाललेला खेळ कार्लसनला अस्वस्थ करणार आहेच आणि त्याचबरोबर जो एक निसटता विजय मिळाल्यास तो किती फसवा होता याची जाणीवदेखील कार्लसनला असणार आहेच. या सर्व गोष्टी विचारात घेता तो उदयाच सामन्याचा फडशा पाडायच्या दृष्टीने खेळ करेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 
आणि इथेच खरी आनंदसाठी संधी आहे! धोका पत्करताना, कार्लसन एका विशिष्ट मर्यादेबाहेर गेल्यास, आनंदसाठी ती सुवर्णसंधीच ठरणार आहे. आणि या वेळेस आनंद कुठलीही दया-माया दाखवायच्या मन:स्थितीत नाहीये ! त्यामुळे कदाचित उदयाच जर आनंदला विजय मिळाला, तर सगळे चित्र पूर्णपणो बदललेले असेल.  एकूण विलक्षण गुंतागुंतीची आणि चमत्कारिक अशी परिस्थिती आहे, हे निश्चित दोन्ही खेळाडूंच्या शारीरिक, मानसिक क्षमतांचा कस लागणार आहे. जो सर्वाेत्तम आहे तोच विजयी होणार, यात काहीच शंका नाही आणि कुणीही विजयी झाला, तर बुद्धिबळासाठी ते मोठे योगदान असणार! 
 
गेल्या सामन्यात काळय़ा मोह:यानिशी खेळणारा आनंद तितकासा भक्कम वाटत नव्हता. रविवारी चांगली सुरवात करुन डावाच्या पहिल्या टप्प्यातच सामन्यावर नियंत्रण मिळविणो आनंदसाठी महत्त्वाचे आहे. काळय़ा मोह:यांनी खेळताना खूपच कमी लोकांनी वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकली आहे.
-पी हरिकृष्णा, ग्रॅण्डमास्टर
 
मला वाटते आनंदच्या खेळावर त्याच्या वयाचा परिणाम होत आहे. सतत तीन तास दबावात बसून राहील्याने तो थकलेला जाणवत आहे. त्याचा खेळ चांगला होत असला तरी आनंद सामना जिंकण्यापेक्षा सामना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. 
-राजा रवि शेखर, इंटरनॅशनल मास्टर
 
मला वाटते पुढची फेरी खूपच रोमहर्षक होईल. शेवटच्या फेरीर्पयत डाव लांबविण्यापेक्षा कार्लसन उद्याच निर्णायक आघाडी मिळविण्यासाठी आक्रमक खेळ करील.
- व्ही रविचंद्रन, फिडे प्रशिक्षक

 

Web Title: Do it for fun or die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.