विराट भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी - महेंद्रसिंग धोनी

By admin | Published: January 13, 2017 02:50 PM2017-01-13T14:50:01+5:302017-01-13T16:28:52+5:30

मी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीला वेळोवळी सल्ला देत राहीन असं महेद्रसिंग धोनी बोलला आहे

Do not be afraid of Virat, I am with you - Mahendra Singh Dhoni | विराट भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी - महेंद्रसिंग धोनी

विराट भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी - महेंद्रसिंग धोनी

Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - मी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीला वेळोवळी सल्ला देत राहीन असं महेद्रसिंग धोनी बोलला आहे. भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच महेंद्रसिंग धोनीने पत्रकारांशी संवाद साधला. इंग्लंडसोबतच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी महेंद्रसिंग धोनीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी धोनीने विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक करत त्याच्यासाठी कर्णधार होण्याची ही योग्य वेळ होती असं म्हटलं आहे.
 
(‘कर्णधार’ धोनीने सीनियर्सना सन्मान दिला)
(कर्णधारपद सोडल्याने धोनीच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत घसरण)
 
पत्रकारांनी यावेळी धोनीला आपल्या कर्णधारपदाच्या इनिंगकडे कसा पाहतो असं विचारला असता एका प्रवासाप्रमाणे होतं असं धोनीने सांगितलं. 'कर्णधारपदाची जबाबदारी निभावताना अनेक आनंदाचे आणि कठीण क्षणांना सामोरं जावं लागलं. एकूणच हे सर्व एका प्रवासाप्रमाणे होतं', अशी भावना धोनीने व्यक्त केली आहे. नेहमीप्रमाणे धोनीने यावेळीही आपल्या बिनधास्त स्टाईलप्रमाणे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. 
 
तुला कोणत्या गोष्टीचा पश्चात्ताप आहे का असं विचारलं असता, 'मी जीवनात कशाचाच पश्चात्ताप करत नाही. जेव्हा तुम्ही कशालाही घाबरत नाही, तेव्हा ते वागणं तुम्हाला मजबूत होण्यास मदत करतं,' असं सांगितलं आहे. धोनीने भारतीय संघाचं भविष्य उज्वल असल्याचंही सांगितलं आहे. 'आपल्याकडे आज खूप चांगले गोलंदाज आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करु शकतात. याचप्रमाणे आपल्याकडे उत्कृष्ट फलंदाजदेखील आहेत. यामुळे कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास संघासमोर समस्या नसेल', असं धोनी बोलला आहे. 
 
कोणी मान्य करो अथवा नको, पण विकेटकीपर संघात नेहमी उप-कर्णधाराची भूमिका निभावत असतो. तो नेहमी कर्णधाराला सल्ला देत असतो. याचप्रमाणे मीदेखील विराट कोहलीला योग्य सल्ले देत राहीन असं धोनीने सांगितलं. धोनी पुन्हा एकदा पहिल्या भुमिकेत जात असल्याने केस वाढवणार का असा सवाल पत्रकाराने विचारला असता आपण पुन्हा केस वाढवणार नाही असं उत्तर धोनीने दिलं. 
 
'संघाला गरज असेल त्याप्रमाणे बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करेन', असं धोनी बोलला आहेत. 'कसोटीशी तुलना करता एकदिवसीय सामन्यांमध्ये कप्तानी करणं सोपं असतं. एकदिवसीय सामन्यात लवकर निर्णय घ्यायचे असले तरी कसोटीपेक्षा ते जास्त सोपं असतं. विराट कोहली आधीपासूनच कसोटी संघाचं कर्णधारपद निभावत असल्याने त्याला जास्त अवघड जाणार नाही', असं धोनीने सांगितलं आहे. 
 
'मला नेहमी नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी द्यायची होती. यामुळेच मी नेहमी खालच्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी यायचो. संघाच्या प्रदर्शनासमोर वैयक्तिक रेकॉर्ड महत्वाचा नसतो', असं धोनीने म्हटलं आहे.
 
 

Web Title: Do not be afraid of Virat, I am with you - Mahendra Singh Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.