अ‍ॅथलिटकडून फारशी अपेक्षा नको : अश्विनी

By admin | Published: June 25, 2016 02:43 AM2016-06-25T02:43:22+5:302016-06-25T02:43:22+5:30

पी. टी. उषाला पराभूत करीत सनसनाटी निर्माण करणारी प्रसिद्ध धावपटू अश्विनी नचप्पा हिला रिओ आॅलिम्पिकमध्ये मोठा चमत्कार होईल

Do not expect much from Athletes: Ashwini | अ‍ॅथलिटकडून फारशी अपेक्षा नको : अश्विनी

अ‍ॅथलिटकडून फारशी अपेक्षा नको : अश्विनी

Next

नवी दिल्ली : पी. टी. उषाला पराभूत करीत सनसनाटी निर्माण करणारी प्रसिद्ध धावपटू अश्विनी नचप्पा हिला रिओ आॅलिम्पिकमध्ये मोठा चमत्कार होईल, याची आशा वाटत नाही. तिच्यानुसार एखादा भारतीय अ‍ॅथलिट फायनलमध्ये पोहोचल्यास ती मोठी उपलब्धी ठरेल.
रिओ आॅलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकेल, असा अ‍ॅथलिट आपल्याला दिसत नाही. पदक जिंकणे तर दूरच असून एखादा अ‍ॅथलिट फायनलमध्ये पोहोचल्यास ती मोठी बाब ठरेल. विकास गौडा आणि सीमा अंतिल यांच्याकडून थोड्याफार आशा ठेवता येतील, कारण ते रिओ आॅलिम्पिकच्या थाळीफेकमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकतात. अन्य खेळाडूंविषयी काही सांगता येणार नाही. ते जास्तीत जास्त दुसऱ्या अथवा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकतात.

Web Title: Do not expect much from Athletes: Ashwini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.