आता मागे वळून पाहणार नाही - विराट कोहली
By admin | Published: March 7, 2017 07:12 PM2017-03-07T19:12:21+5:302017-03-07T19:12:21+5:30
पहिली कसोटी गमावल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं तेच आम्ही केलं. आम्हाला मालिकेत पुनरागमन करायचं होतं आणि दुसरं कोणाला नाही तर आम्हाला स्वतःला सिद्ध करायचं होतं.
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - ''पहिली कसोटी गमावल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं तेच आम्ही केलं. आम्हाला मालिकेत पुनरागमन करायचं होतं आणि दुसरं कोणाला नाही तर आम्हाला स्वतःला सिद्ध करायचं होतं'', असं बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव केल्यानंतर विराट कोहली म्हणाला.
''सर्वांनी स्वतःची जबाबदारी ओळखण्याची गरज असते तेच आमच्या खेळाडूंनी केलं. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू शकतो हा खेळाडूंचा विश्वास होता. मेच पाहायला आलेल्या प्रेक्षकांनीही आमची साथ दिली. ऑस्ट्रेलियाचा संघ दुस-या डावामध्ये मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला त्याचवेळी सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो हे आम्हाला समजलं होतं. 150 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य दिलं तरी आपण पुनरागमन करू शकतो हा विश्वास होता. अजिंक्य रहाणे आणि पुजारामध्ये झालेली भागीदारी महत्वाची होती. शेवटच्या विकेटसाठी इशांत आणि साहामध्ये झालेली भागीदारी आमच्यासाठी बोनस ठरली. 187 धावांचं लक्ष्य दिलं तेव्हा कशी गोलंदाजी करायची आहे हे आम्हाला माहित होतं. आम्हाला हा सामना आजच संपवायचा होता. रांचीमध्ये होणा-या तिस-या कसोटीसाठी आम्ही आतूर आहोत, आता मागे वळून पाहणार नाही'', असं मॅच संपल्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये बोलताना विराट कोहली म्हणाला.
बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करून भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधून पुनरागमन केले.