मुलाचं नाव दाऊद ठेऊ नकोस, इरफान पठाणला ट्विटरकराचा सल्ला
By admin | Published: December 28, 2016 10:16 AM2016-12-28T10:16:22+5:302016-12-28T10:21:00+5:30
आपल्या मुलाचं नाव दाऊद किंवा याकूब ठेवू नकोस असा सल्ला इरफान पठाणला एका व्यक्तीने ट्विटरवर दिला
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - टीम इंडियाचा ऑलराउंडर क्रिकेटर इरफान पठाणच्या घरी काही दिवसांपुर्वी नवा पाहुणा आला आहे. इरफानची पत्नी सफा बेगने गोंडस बाळाला मुलाला जन्म दिला आहे. मंगळवारी सोशल मीडियावर इरफानने बाबा झाल्याचे ट्विट करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. यानंतर चाहत्यांनीदेखील इरफानचं अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. पण सोशल मीडियावर शुभेच्छांसहित फुकटचे सल्लेही देण्यात आले. यामधील एकाने सैफ - करिना वादाच्या पार्श्वभुमीवर इरफानला आपल्या मुलाचं नाव दाऊद ठेवू नको असा सल्ला दिला.
सैफ अली खान आणि करिनाने आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरुन अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत नावाला विरोध केला होता. यामुळे अनेक वादही निर्माण झाले. याच पार्श्वभुमीवर एका व्यक्तीने इरफान पठाणला 'मुलगा झाल्याबद्दल शुभेच्छा, पण त्याचं नाव दाऊद किंवा याकूब ठेवू नका, हे जग हास्यास्पद आहे', असा सल्ला दिला.
इरफान पठाणेनेदेखील या ट्विटला योग्य उत्तर दिलं. 'नाव काहीही असो पण एक गोष्ट नक्की आहे की तो आपल्या आजोबा आणि वडिलांप्रमाणे देशाच नाव मोठं करेल', असं उत्तर इरफानने ट्विटला दिलं.
इरफान पठाणने आपल्या मुलाचं नावर इमरान खान पठाण ठेवलं आहे. हे नाव आपल्या कुटुंबाच्या अगदी जवळ असल्याचं त्याने सांगितलं आहे.
This name is close to our hearts n family....The name is IMRAN:) #Imrankhanpathan@iamyusufpathanpic.twitter.com/MbgKQMozDe
— Irfan Pathan (@IrfanPathan) 25 December 2016