धरमशाला येथे पाकने खेळू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2016 04:14 AM2016-03-03T04:14:22+5:302016-03-03T04:14:22+5:30

विश्वचषक टी-२० क्रिकेटचा भारत-पाक हा महत्त्वपूर्ण सामना १९ मार्च रोजी धरमशाला येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यावरून राजकीय खडाजंगी होत असताना आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी

Do not play Pak in Dharamshala | धरमशाला येथे पाकने खेळू नये

धरमशाला येथे पाकने खेळू नये

Next

कराची : विश्वचषक टी-२० क्रिकेटचा भारत-पाक हा महत्त्वपूर्ण सामना १९ मार्च रोजी धरमशाला येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यावरून राजकीय खडाजंगी होत असताना आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी वादात उडी घेत पाकने धरमशाला येथे भारताविरुद्ध खेळू नये, असा सल्ला दिला.
बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांच्याशी फोनवर चर्चा करताना पाक संघाला भारतात सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्याआधी पीसीबीने धरमशाला येथील सामन्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे आयसीसीला पत्र लिहिले होते. मनी म्हणाले, ‘धरमशाला येथे अशास्थितीत आॅस्ट्रेलियाला खेळायचे असते, तर त्यांनी खेळण्यास नकार दिला असता. पीसीबीने आयसीसीला ठणकावून सांगावे की, आम्हाला धरमशाला येथे खेळायचे नाहीच.’
हिमाचल प्रदेश सरकारने भारतीय सैनिक तळावरील हल्ल्याचे उदाहरण देत सैनिकांच्या बलिदानाचा आदर म्हणून पाक संघाला धरमशाला येथे सुरक्षा पुरविण्यास असमर्थता व्यक्त केली. बीसीसीआयने हिमाचल सरकारच्या या निर्णयावर टीका केली.
मनोहर - शहरयार यांच्यात झालेल्या चर्चेच्यावेळी धरमशाला येथील लढत इतरत्र हलविण्याची वेळ आल्यास ती कुठे होऊ शकते, यावरदेखील चर्चा झाली.
दोन्ही अध्यक्षांनी आणीबाणीच्या स्थितीत मोहाली किंवा कोलकाता येथे हा सामना होऊ शकतो,
यावर एकमत व्यक्त केल्याची माहिती आहे. (वृत्तसंस्था)
पाकला धरमशाला येथे खेळण्याची परवानगी राज्य सरकारकडून नाकारली गेल्याने, या इशाऱ्याकडे पाकने गंभीरपणे बघणे गरजेचे आहे. आमचे खेळाडू, अधिकारी, चाहते आणि मीडियातील लोकांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. पीसीबीने ही धमकी लक्षात घेऊन तेथे खेळू नये, असा माझा सल्ला राहील.
- एहसान मनी
> ...तर एचपीसीएच्या
अध्यक्षपदाचा राजीनामा : ठाकूर
सिमला : धरमशाला येथे भारत-पाक विश्वचषक टी-२० सामन्याचे आयोजन करण्यावरून राजकारण सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या अस्मितेचा हा प्रश्न असल्याने गरज भासल्यास हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या प्रमुख पदावरून मी पायउतार होण्यास तयार असल्याचा बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पुनरुच्चार केला.
ते म्हणाले,‘भारत-पाक सामना द्विपक्षीय मालिका नाही. हा आंतरराष्ट्रीय सामना असल्याने राजकारण करू नये. राजकारणापलीकडे देश व राज्याच्या हिताचा विचार व्हावा. हिमाचलच्या अस्मितेसाठी मी गरज भासल्यास पदाचा राजीनामा देईन, शिवाय विरोधी लोकांसमोर हात जोडून विनंती करण्यास तयार आहे. सामन्याच्या आयोजनात पदाचा अडसर असेल, तर पददेखील सोडण्याची आपली तयारी आहे. भारत-पाक सामन्यासाठी मतभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज आहे.’

Web Title: Do not play Pak in Dharamshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.