राष्ट्रकुलमधून नेमबाजी वगळू नये : क्रीडामंत्री राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:31 AM2018-04-12T03:31:02+5:302018-04-12T03:31:16+5:30

बर्मिंघम(२०२२) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याचे निश्चित झाले आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी मात्र हा खेळ कायम राहावा यासाठी ब्रिटिश क्रीडामंत्री आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या (सीजीएफ) प्रमुखांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

Do not skip shooting at the Commonwealth Games: Sports Minister Rathore | राष्ट्रकुलमधून नेमबाजी वगळू नये : क्रीडामंत्री राठोड

राष्ट्रकुलमधून नेमबाजी वगळू नये : क्रीडामंत्री राठोड

googlenewsNext

नवी दिल्ली: बर्मिंघम(२०२२) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याचे निश्चित झाले आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी मात्र हा खेळ कायम राहावा यासाठी ब्रिटिश क्रीडामंत्री आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या (सीजीएफ) प्रमुखांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. सीजीएफने खेळ कायम ठेवावा किंवा वगळावा याचा निर्णय यजमान देशावर सोपविला. यजमान इंग्लंड असून हा खेळ ऐच्छिक म्हणून ठेवला आहे. राठोड यांनी सीजीए अध्यक्ष लुईस मार्टिन यांना पत्र लिहिलेच शिवाय ब्रिटिश खासदारांसह विविध मंत्रालयांना पत्र लिहिले आहे. राठोड हे स्वत: आॅलिम्पिक पदक विजेते नेमबाज आहेत.
>मेरीकोम अंतिम फेरीत
बॉक्सिंग: विकास, सोळंकी,कौशिक उपांत्य फेरीत गोल्ड कोस्ट : राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या बॉक्सिंगमध्ये एमसी मेरीकोम हिने देशाला पहिले सुवर्ण मिळवून देण्याच्या निर्धाराने एक पाऊल पुढे टाकले. बुधवारी ४८ किलो वजन गटात मेरीने अंतिम फेरीत धडक दिली, तर विकास कृष्णन (७५), गौरव सोळंकी (५२) आणि मनीष कौशिक (६०) हे देखील उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. पाच वेळेची विश्वचॅम्पियन आणि आॅलिम्पिक कांस्यविजेती मेरीकोमची ही पहिलीच राष्टÑकुल स्पर्धा आहे. तिने श्रीलंकेची अनुषा दिलरुकशी हिच्याविरुद्धची लढत ५-० ने जिंकली. ३५ वर्षांच्या मेरीने ३९ वर्षांच्या अनुषावर डावपेचात मात केली. अखेरच्या तीन मिनिटांत अनुषा मेरीकोमवर वरचढ झाली खरी; पण तोवर बराच उशीर झाला होता. आता मेरीकोमला उत्तर आयर्लंडची ख्रिस्टिना ओहारा हिच्याविरुद्ध खेळावे लागेल. ख्रिस्टिनाने न्यूझीलंडची तस्मीन बेनी हिच्यावर मात केली. माजी विश्व आणि आशियाई चॅम्पियन एल. सरिता देवी हिला मात्र अपयश आले. ती ६० किलोगटात आॅस्ट्रेलियाची अंजा स्ट्राइड्समॅनकडून पराभूत झाली. माझी प्रतिस्पर्धी बॉक्सर फारच वेगवान होती. ती माझी चूक कुठे होती या प्रतीक्षेत होती. मी मात्र चूक होऊ नये याची काळजी घेत सावध खेळले. अनुभवी प्रतिस्पर्धी खेळाडूला नमविल्याचा आनंद आहे.’’
- एमसी मेरीकोम, बॉक्सर.

Web Title: Do not skip shooting at the Commonwealth Games: Sports Minister Rathore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.