विराट आणि सर्फराज मधले हे साम्य तुम्हाला माहिती आहे का?
By admin | Published: June 16, 2017 03:15 PM2017-06-16T15:15:02+5:302017-06-16T15:15:02+5:30
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद या दोघांमध्ये केवळ आपापल्या संघांचे कर्णधारपद असणे इतकेच साम्य नाही. या दोघांनी आपापल्या देशांना वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.16- भारताने बांगलादेशला उपान्त्य फेरीमध्ये हरवल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद या दोघांमध्ये केवळ आपापल्या संघांचे कर्णधारपद असणे इतकेच साम्य नाही. या दोघांनी आपापल्या देशांना वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे.
अंडर 19 क्रिकेटमधून विविध खेळाडू नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावतात. रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये असेच दोन अंडर 19मधून पुढे आलेले आणि संघाचे कप्तान झालेले खेळाडू एकमेकांच्या समोर येत आहेत. 2006 साली श्रीलंकेत झालेला अंडर 19 वर्ल्ड कप पाकिस्तानने जिंकला होता. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यावेळेस पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व सर्फराज अहमदने केले होते. पाकिस्तानने हा सामना 38 धावांनी जिंकला होता. त्यानंतर 2008 साली मलेशियामध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारताने अजिंक्यपद मिळवले होते. यावेळेस अंतिम सामन्यामध्ये भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होता. 2006 सालच्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यामध्ये झालेल्या पराभवाची भरपाई विराट कोहलीच्या संघाने यावेळेस केली. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यामध्ये 45.4 षटकांमध्ये 159 धावा केल्या होत्या. मात्र प्रतिस्पर्धी दक्षिण अफ्रिकाचा संघ ते आव्हान पूर्ण करु शकला नाही. आता रविवारी हे दोन्ही विजयी कर्णधार आपापल्या देशांचे नेतृत्व चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी करणार आहेत.