एबी डिव्हिलीयर्सबद्दल या खास '१०' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

By admin | Published: May 25, 2016 02:02 PM2016-05-25T14:02:18+5:302016-05-25T14:41:53+5:30

गुजरातविरुद्धचा क्वॉलिफायरचा सामना हातातून जवळजवळ निसटलेला असतानाच धडाकेबाज फलंदाजी करत बंगळुरूला अंतिम फेरी गाठून देणा-या एबी डिव्हीलीयर्सबद्दलच्या खास गोष्टी...

Do you know these special '10' things about AB Diviliers? | एबी डिव्हिलीयर्सबद्दल या खास '१०' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

एबी डिव्हिलीयर्सबद्दल या खास '१०' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - आयपीएलच्या ९व्या सत्रातील पहिल्या क्वॉलिफायरमधील गुजरातविरुद्धचा सामना हातातून जवळजवळ निसटलेला असतानाच धडाकेबाज फलंदाजी करत बंगळुरूला अंतिम फेरी गाठून देणा-या एबी डिव्हीलीयर्सची (नाबाद ७९ धावा) सध्या बरीच चर्चा सुरू आहे. मूळचा दक्षिण आफ्रिकेचा हा फलंदाज आयपीएलमध्येही उत्तम कामगिरी करत असून त्याच्या तूफान फलंदाजीचे शेकडो चाहते आहेत. एबी डिव्हीलीयर्सने क्रिकेटप्रमाणेच इतर क्षेत्रात, खेळातही उल्लेखनीय कामगिरी केली असून त्याच्याबद्दलच्या काही खास निवडक गोष्टींची माहिती तुमच्यासाठी...
 
१) एबी डिव्हीलीयर्सचा जन्म १७ फेब्रुवारी १९८४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रेटोरिया येथे झाला. एक उत्तम क्रिकेटपटू असलेल्या एबी डिव्हीलीयर्सला लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती.
२) ज्युनिअर नॅशनल हॉकी स्क्वॉडमध्ये तो गोलकीपर होता. 
३) तसेच ज्युनिअर नॅशनल फूटबॉल संघातही डिव्हीलीयर्सची निवड झाली होती.
 
४) दक्षिण आफ्रिकेच्या ज्युनिअर रग्बी संघाचे कप्तानपदही डिव्हीलीयर्सने भूषवले आहे. दक्षिण आफ्रिकेत शालेय स्तरावरील स्वीमिंगमध्ये डिव्हीलीयर्सच्या नावावर सहा विक्रम आहेत. 
५) एवढेच नव्हे तर तो ऑलराऊंडर असून अभ्यास व खेळाशिवाय त्याला संगीतातही रस असून २०१० साली त्याने स्वत:चा 'म्युझिक अल्बम'ही काढला होता. 
६) डीव्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिका ज्युनिअर डेव्हिस कप टेनिस संघाचा सदस्य होता.
 
७) १९ वर्षांखालील नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता. १९ वर्षांखालील गोल्फ टूर्नामेंटमध्येही डिव्हीलीयर्सने मिळवला होता विजय. 
८) डीव्हिलीयर्स हा तळागातील  मुले व कॅन्सर पीडितांसाठी केपटाऊनमध्ये उघडण्यात आलेल्या रुग्णालयाचा संस्थापक सदस्य व मुख्य देणगीदार आहे.  डिव्हीलीयर्सने झिम्बाब्वेमधील एक गाव दत्तक घेतले असून त्या गावाच्या विकासासाठी तो निधी देत असतो.
९) इतर क्षेत्रात प्राविण्य मिळवणारा डिव्हीलीयर्स अभ्यासातही अतिशय हुशार होता. विज्ञानातील एका प्रोजेक्टसाठी त्याला दिवंगत राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्याकडून मानाचे राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले होते. 
१०) डिव्हीलीयर्स हा अतिशय झंझावाती खेळाडू असून त्याने अवघ्या १६ चेंडूंमध्य अर्धशतक तर ३१ चेंडूमध्ये शतक ठोठावले आहे.

Web Title: Do you know these special '10' things about AB Diviliers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.