डोमेन, नाओमी यांना सर्वोत्कृष्ट हॉकीपटूचा पुरस्कार

By admin | Published: February 24, 2017 01:14 AM2017-02-24T01:14:10+5:302017-02-24T01:14:10+5:30

बेल्जियमचा कर्णधार आणि आॅलिम्पिक पदकविजेता जॉन डोमेन तसेच नेदरलँड्स संघाची नाओमी वॉन एस यांना

Domaine, Naomi Best Player Award | डोमेन, नाओमी यांना सर्वोत्कृष्ट हॉकीपटूचा पुरस्कार

डोमेन, नाओमी यांना सर्वोत्कृष्ट हॉकीपटूचा पुरस्कार

Next

चंडीगड : बेल्जियमचा कर्णधार आणि आॅलिम्पिक पदकविजेता जॉन डोमेन तसेच नेदरलँड्स संघाची नाओमी वॉन एस यांना आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने २०१६चे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित केले. हॉकीच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या सोहळ्यात सर्वोत्कृट खेळाडू, गोलकीपर, प्रतिभावान खेळाडू, कोचेस आणि पंचांचा गौरव करण्यात आला.
भारताचा कर्णधार आणि गोलकीपर पी. आर. श्रीजेश हा गोलकीपरच्या तसेच हरमनप्रीतसिंग हा प्रतिभावान खेळाडूच्या शर्यतीत होता; पण दोघांनाही पुरस्कार जिंकण्यात अपयश आले. ब्रिटनची मॅडी हिच हिला महिला गटात सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. पुरुष गटात हा पुरस्कार आयर्लंडचा डेव्हिड हर्टे याने पटकविला.
बेल्जियमचा आर्थर वॉन डोरेन याला सर्वोत्कृष्ट प्रतिभावान खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. महिला गटात हा पुरस्कार अर्जेंटिनाची मारिया ग्रानाटो हिने जिंकला.
सर्वोत्कृष्ट कोचचे दोन्ही गटांतील पुरस्कार ब्रिटन संघाला मिळाले. डॅनी केरी आणि कारेन ब्राऊन यांना हे पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट पुरुष पंच जर्मनीचे ख्रिस्टियन ब्लाश हे तर पहिला पंच म्हणून बेल्जियमच्या लॉरिन डेन फोर्ज पुरस्काराचे मानकरी ठरले.
या प्रसंगी एफआयएच अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले, ‘‘जागतिक स्तरावर नैपुण्यप्राप्त पुरस्कारविजेत्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. या पुरस्कारांमुळे भावी पिढीला प्रेरणा मिळत राहील.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Domaine, Naomi Best Player Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.