डोप टेस्टसाठी बॅडमिंटनपटू ली चोंग वेई नॉव्रेला जाणार
By Admin | Published: October 30, 2014 01:28 AM2014-10-30T01:28:16+5:302014-10-30T01:28:16+5:30
कथितरीत्या डोपिंग परीक्षणात अपयशी ठरलेला जागतिक क्रमवारीतील अव्वल बॅडमिंटनपटू मलेशियाचा ली चोंग वेई रविवारी दुस:या चाचणीसाठी नॉव्रेला जाणार आहे. मीडियाने बुधवारी हे वृत्त दिले.
क्वालालम्पूर : कथितरीत्या डोपिंग परीक्षणात अपयशी ठरलेला जागतिक क्रमवारीतील अव्वल बॅडमिंटनपटू मलेशियाचा ली चोंग वेई रविवारी दुस:या चाचणीसाठी नॉव्रेला जाणार आहे. मीडियाने बुधवारी हे वृत्त दिले.
देशातील एक बॅडमिंटनपटू अलीकडे डोप परीक्षणात अपयशी ठरल्याचे मलेशियन मीडियाने म्हटले आहे. पण, लघवीचा दुसरा नमुना येईस्तोवर त्याची ओळख जाहीर करण्यास नकार दिला होता. पण अव्वल खेळाडू असलेला ली चोंग वेई याची ओळख गुप्त ठेवता आली नाही, कारण ऑगस्ट महिन्यात डेन्मार्कमध्ये झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान ली प्रतिबंधित औषध डेक्सामिथासोन सेवनात दोषीं आढळला होता.
स्टार वृत्तपत्रने दिलेल्या वृत्तानुसार ली ची दुसरी नमुना चाचणी पाच नोव्हेंबर रोजी होईल. मलेशिया बॅटमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष नोर्जा झकारिया यांच्याकडून ही माहिती मिळाल्याचे वृत्तात म्हटले आहे. नोर्जा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, पण अन्य अधिका:यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मलेशियाच्या अधिका:यांना लीच्या अपयशी चाचणीबद्दल 1 ऑक्टोबर रोजी माहिती मिळाली. ली ने हे औषध वैद्यकीय उपचारादरम्यान चुकीने तर घेतले नव्हते, याचा तपास करण्यात येत असल्याचे स्थानिक अधिका:यांचे मत आहे.
ली चोंग वेई गेल्या काही आठवडय़ापासून जांघेच्या जखमेमुळे त्रस्त आहे. त्यासाठी जुलै महिन्यात त्याने स्टेम शेल्सचे इन्जेक्शन्स घेतले.
विश्व बॅडमिंटन रँकिंगमध्ये अनेक वर्षापासून ली चे वर्चस्व आहे. पण तो विश्व चॅम्पियनशिप किंवा ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्यात अपयशी ठरला. डेन्मार्कमध्येदेखील ली याला फायनलमध्ये चीनचा चेन लोंग याने पराभूत केले होते. द. कोरियातील इंचियोनमध्ये झालेल्या आशियाडच्या उपांत्य फेरीत ली चोंग हा चीनचा लीन दान याच्याकडून पराभूत झाला. त्यानंतर थकवा जाणवत असल्याचेकारण देत त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती.(वृत्तसंस्था)