डोपिंगला ‘गुन्हा’ ठरविण्यावर चर्चा होणार

By admin | Published: April 27, 2017 12:51 AM2017-04-27T00:51:57+5:302017-04-27T00:51:57+5:30

डोपिंगप्रती कुठलीही दयामाया दाखवायची नाही, असे केंद्र सरकारने ठरविले आहे.

Doping will be discussed on 'crime' decision | डोपिंगला ‘गुन्हा’ ठरविण्यावर चर्चा होणार

डोपिंगला ‘गुन्हा’ ठरविण्यावर चर्चा होणार

Next

नवी दिल्ली : डोपिंगप्रती कुठलीही दयामाया दाखवायची नाही, असे केंद्र सरकारने ठरविले आहे. राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजेन्सीद्वारा (नाडा) आज गरुवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी डोपिंगला गुन्हा ठरविण्यासंदर्भात विचार होणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिली.
फुटबॉल गोलकिपर सुब्रत पाल प्रतिबंधित पदार्थ सेवनात पॉझिटिव्ह आढळताच भारतीय फुटबॉल विश्वाला हादरा बसला. या पार्श्वभूमीवर गोयल यांनी हे संकेत दिले. सुब्रतचा ‘ब’ नमुना अद्याप यायचा आहे. नाडा, भारतीय आॅलिम्पिक संघटना, राष्ट्रीय क्रीडा महासंघ तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाने डोपिंगप्रती कडक धोरण अवलंबण्याच्या सूचना गोयल यांनी दिल्या आहे.
आजच्या चर्चासत्रात डोपिंगविरुद्ध काय धोरण अवलंबायचे यावर मंथन होणार असून डोपिंग गुन्हा ठरविण्यावर देखील चर्चा केली जाणार आहे. शाळा, कॉलेजमध्ये नियमित चर्चासत्रांचे आयोजन करून जनजागृती मोहीम राबवावी. जाहिरातींच्या माध्यमातून डोपिंगचे दुष्परिणाम युवा पिढीला समजावून सांगण्याच्या सूचना मंत्र्यांनी नाडाला दिल्यात.
क्रीडा मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात गोयल यांनी सरकारतर्फे फूड सप्लिमेंटचे परीक्षण करण्याविषयी पद्धत काय असावी यावर विचार सुरू असून जे खेळाडू सप्लिमेंट घेतात त्यांनी प्रतिबंधित औषध सेवनापासून दूर रहावे, असे आवाहन क्रीडापटूंना करण्यात आले आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: Doping will be discussed on 'crime' decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.