डोपिंग : रशिया, कझाक, बेलारुसच्या वेटलिफ्टर्सवर वर्षभराची बंदी
By admin | Published: August 18, 2016 01:25 AM2016-08-18T01:25:24+5:302016-08-18T01:25:24+5:30
आॅलिम्पिक आटोपताच डोपिंगप्रकरणी रशिया, कझाकिस्तान आणि बेलारुसच्या वेटलिफ्टर्सवर वर्षभराची बंदी लावली जाईल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने बुधवारी केली.
रिओ : आॅलिम्पिक आटोपताच डोपिंगप्रकरणी रशिया, कझाकिस्तान आणि बेलारुसच्या वेटलिफ्टर्सवर वर्षभराची बंदी लावली जाईल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने बुधवारी केली.
ही बंदी सप्टेंबरअखेर किंवा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल, अशी माहिती आयडब्ल्यूएफचे अध्यक्ष थॉमस अजान यांनी दिली. ते म्हणाले, सातत्याने डोपिंगमध्ये अडकलेल्या रशिया, कझाक आणि बेलारुसवर ही बंदी लावली जाईल. सलग डोपिंगमध्ये अडकलेल्या रशिया आणि बल्गेरियाच्या खेळाडूंना आम्ही रिओमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात खेळण्याची परवानगी दिली नव्हती.
इराणच्या वेटलिफ्टरचा विश्वविक्रम
- इराणचा वेटलिफ्टर बहदाद सलिमीकोरदासियाबी याने पुरुषांच्या हेवीवेट प्रकारात(१०५ किलोच्या वर) स्रॅचमध्ये २१६ किलो वजन उचलून रिओ आॅलिम्पिकमध्ये नवा विश्वविक्रम नोंदविला. सलिमीच्या नावे आधी २१४ किलो वजन उचलण्याचा विक्रम होता. जॉर्जियाचा लाशा तालाखाजे याने तिसऱ्या प्रयत्नांत २१५ किलो वजन उचलून हा विक्रम स्वत:च्या नावे केला. हा विक्रम लाशाच्या नावे केवळ एक मिनिट राहिला. सलिमीने पुन्हा नव्या विश्वविक्रमाची नोंद आपल्या नावावर केली.
रशियाच्या खेळाडूचे सुवर्ण हिसकले
डोपिंगमुळे २००८ साली बीजिंग आॅलिम्पिकमध्ये महिलांच्या ४ बाय १०० मीटर प्रकारात सुवर्ण विजेत्या रशियाच्या संघातील यूलिया चर्मोशंस्काया या सुवर्ण विजेतीचे पदक हिसकण्यात आले आहे. ती डोपिंगमध्ये दोषी आढळली होती. रशियाच्या रिले संघाला देखील अपात्र घोषित करण्यात आले.