पुण्याच्या तनिष्का देशपांडेचे दुहेरी मुकुट
By Admin | Published: July 14, 2016 09:14 PM2016-07-14T21:14:48+5:302016-07-14T22:17:14+5:30
पुण्याच्या तनिष्का देशपांडेने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना १५ वर्षांखालील मुलींच्या गटात एकेरी व दुहेरी विजेतेपद पटकावताना दुसऱ्या महाराष्ट्र राज्य डॉ. विजय पाटील सब - ज्युनिअर
राज्य बॅडमिंटन : स्पर्धेवर पुणेकरांचे वर्चस्व
मुंबई : पुण्याच्या तनिष्का देशपांडेने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना १५ वर्षांखालील मुलींच्या गटात एकेरी व दुहेरी विजेतेपद पटकावताना दुसऱ्या महाराष्ट्र राज्य डॉ. विजय पाटील सब - ज्युनिअर बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावले. विशेष म्हणजे या स्पर्धेत पुणेकरांचा दबदबा राहिला. तर बृहन्मुंबईच्या ह्रीषा दुबे - खुशी कुमारी यांना मुलींच्या १३ वर्षांखालील दुहेरीचे विजेतेपद पटकावण्यात यश आले.
नेरुळ येथील डीवाय स्पोटर््स अॅकेडमी येथे रायगड बॅडमिंटन संघटनेच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत तनिष्काने मुलींच्या १५ वर्षांखालील एकेरी अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवताना बृहन्मुंबईच्या रुद्रा राणेचे आव्हान २१-९, २१-११ असे सहजपणे परतावले. तर यानंतर मुलींच्या १५ वर्षांखालील दुहेरी गटातही वर्चस्व राखताना तनिष्काने मुंबई उपनगरच्या जान्हवी जगतापसह खेळताना अनन्या फडके - शताक्षी किनिकर या पुणेकर जोडीला २१-१४, २१-७ असे नमवले.
मुलांच्या १५ वर्षांखालील एकेरी गटात नागपूरच्या रोहन गुरबानी याने नागपूरच्याच सुधांशू भुरेचे कडवे आव्हान १७-२१, २१-११, २१-१३ असे परतावून विजेतेपदाला गवसणी घातली. तर या वयोगटातील दुहेरी गटात आयुष खांडेकर - पार्थ घुबे या पुणेकरांनी जेतेपदावर कब्जा करताना राहुल काणे - रोहन थूल या ठाणेकरांना २१-९, २१-९ असे पराभूत केले. (क्रीडा प्रतिनिधी)
इतर निकाल :
१३ वर्षांखालील :
एकेरी -
(मुले) : स्कंद शानबाग (नाशिक) वि.वि. प्रज्ज्वल सोनावणे (नाशिक) २१-१५, २१-७.
(मुली) : तारा शाह (पुणे) वि.वि. रुचा सावंत (पुणे) २१-१२, २४-२२.
दुहेरी -
(मुले) : आर्य ठाकोरे - ध्रुव ठाकोरे (पुणे) वि.वि. अथर्व जोशी - सिध्दार्थ भुता (मुंबई उपनगर) १८-२१, २१-१३, २१-८.
(मुली) : ह्रिशा दुबे - खुशी कुमारी (बृहन्मुंबई) वि.वि. रिया हब्बू - साहन्या कुलकर्णी (पुणे) २१-१९, २०-२२, २१-१२.