हिृशा दुबेची दुहेरी आगेकूच

By admin | Published: July 28, 2016 12:24 AM2016-07-28T00:24:47+5:302016-07-28T00:24:47+5:30

हिृशा दुबे या क्रिकेट क्लब ओफ इंडिया (सीसीआय) संघाच्या खेळाडूने बृहन्मुंबई जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आपला दबदबा राखताना मुलींच्या १५ व १३ वर्षांखालील

Double Decker of Hira Dube | हिृशा दुबेची दुहेरी आगेकूच

हिृशा दुबेची दुहेरी आगेकूच

Next

मुंबई : हिृशा दुबे या क्रिकेट क्लब ओफ इंडिया (सीसीआय) संघाच्या खेळाडूने बृहन्मुंबई जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आपला दबदबा राखताना मुलींच्या १५ व १३ वर्षांखालील गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी पुजा काचरे, रुद्रा राणे यांनीही १५ वर्षांखालील गटातून आगेकूच केली.
हिृशाने जबरदस्त वर्चस्व राखताना १५ वर्षांखालील गटात एकहाती वर्चस्व राखताना साची जुकरचा २१-५, २१-१३ असा धुव्वा उडवला. हिृशाच्या धडाक्यापुढे साचीचा काहीच निभाव लागला नाही. तीच्या आक्रमकतेपुढे साचीने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्नही सोडून दिले. त्याच वेळी पुजाने साक्षी शेटेला २१-७, २१-११ असे नमवूण उपांत्य फेरी गाठली, तर रद्राने खुशी कुमारीला २१-१३, २१-१० असा धक्का देत आगेकूच केली.
मुलींच्या १३ वर्षांखालील गटातही हिृशाने आपला दबदबा राखला. सुरुवातीपासूनच तुफानी खेळ करताना हिृशाने जान्हवी महालेचा २१-१, २१-७ असा फडशा पाडताना दिमाखात उपांत्य फेरी गाठली, तर १५ वर्षांखालील गटात अपयशी ठरलेल्या साचीने सान्वी मार्डोलकरला २१-६, २१-८ असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. खुशीनेदेखील उपांत्य फेरीत प्रवेश करताना गौरी वैश्यंपायनचे आव्हान २१-१३, २१-७ असे संपुष्टात आणले, तर अन्य सामन्यात तारिनी सुरीने उत्कर्ष सिन्हाचे आव्हान २१-८, २१-१० असे परतावून उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Double Decker of Hira Dube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.