दुहेरीची जोडी अद्याप ठरलेली नाही - भूपती

By admin | Published: April 5, 2017 12:19 AM2017-04-05T00:19:54+5:302017-04-05T00:19:54+5:30

डेव्हिस चषक स्पर्धेतील उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी अद्याप भारताची दुहेरीची जोडी निश्चित झाली

Doubles pair is still not clear - Bhupathi | दुहेरीची जोडी अद्याप ठरलेली नाही - भूपती

दुहेरीची जोडी अद्याप ठरलेली नाही - भूपती

Next

कोलकाता : डेव्हिस चषक स्पर्धेतील उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी अद्याप भारताची दुहेरीची जोडी निश्चित झाली नसल्याचे स्पष्टीकरण भारताचा कर्णधार महेश भूपती याने दिले आहे. या स्पर्धेतील सर्व सामने जिंकण्यावर भर देणार असल्याचेही त्याने सांगितले.
भूपती म्हणाला, ‘डेव्हिस चषकमध्ये एक गुण मिळवायचा नसतो, तर तीन गुण मिळवावे लागतात. त्यामुळे आम्हाला तीन गुण मिळविण्याकडे लक्ष दिले पाहिजेत. दुहेरीतील जोडीबाबत सर्वत्रच खूप चर्चा होत आहे व पुढील ४८ तास ती होत राहील.’ भूपती पुढे म्हणाला, ‘आमचे लक्ष हे कोर्टवर उतरून तीन गुण मिळविणे हेच असले पाहिजे.’
भूपतीने या सामन्यासाठी चार तज्ज्ञ खेळाडूंची निवड केली आहे. यानंतर दुहेरीतील जोडीबाबत चर्चा सुुरू झाली आहे. लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्याच्या भूपतीच्या निर्णयावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. मात्र, युकी भांबरी दुखापतग्रस्त असल्यामुळे या दोघांपैकी एकजण खेळणार हे मात्र निश्चित झाले आहे.
भारत दुहेरीतील मजबूत दावेदार असल्याचा दावाही भूपतीने फेटाळला. तो म्हणाला, ‘आम्ही नेहमीच सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाच मैदानात उतरविले. तुम्ही काही सामने जिंकता, तर काही सामन्यांत पराभव पत्करावा लागतो. आम्ही २२ स्पर्धा जिंकल्या याचा अर्थ हा वारसा पुढे चालूच राहील असा होत नाही.’
दुहेरीपेक्षा एकेरीच्या सामन्यावर भर देण्याच्या त्याच्या भूमिकेबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘दुहेरीतील तज्ज्ञ खेळाडूंच्या कमतरतेमुळे असा विचार करावा लागत आहे.’ (वृत्तसंस्था)
>आमच्याकडे चार पर्याय : पेट्र लेब्ड
दुखापतीमुळे आमच्या संघातील आघाडीचा खेळाडू डेनिस डस्तोमिन डेव्हिस चषक लढतीत खेळू शकला नाही, तर आमच्याकडे अन्य चार पर्याय उपलब्ध आहेत, असे उझबेकिस्तानचा कर्णधार पेट्र लेब्ड याने बंगलोर येथे स्पष्ट केले. कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेच्या स्टेडियमवर तो पत्रकारांशी बोलत होता. तो म्हणाला, जर इस्तोमिन खेळू शकला नाही, तर मी अन्य कोणाला खेळवायचे ते ठरवेन. इस्तोमिनच्या वैद्यकीय अहवालानंतरच त्याची दुखापत कितपत गंभीर आहे ते कळेल, असे त्याने सांगितले.

Web Title: Doubles pair is still not clear - Bhupathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.