एक डाव धोबी पछाड

By admin | Published: August 10, 2014 02:58 AM2014-08-10T02:58:39+5:302014-08-10T02:58:39+5:30

कोणताही प्रतिकार नाही की जिंकण्याची जिद्द नाही.. साउथॅम्पटनमधील शेवटच्या दिवशी भारताने जसी हाराकिरी केली त्याचा अॅक्शन रिप्ले ओर्ल्ड ट्रॅफोर्डवर आज पहायला मिळाला.

A Dove Dhobi run | एक डाव धोबी पछाड

एक डाव धोबी पछाड

Next
>कोणताही प्रतिकार नाही की जिंकण्याची जिद्द नाही.. साउथॅम्पटनमधील शेवटच्या दिवशी भारताने जसी हाराकिरी केली त्याचा अॅक्शन रिप्ले ओर्ल्ड ट्रॅफोर्डवर आज पहायला मिळाला. पहिल्याच दिवशी मनातून हरलेल्या भारतीय संघाने तिस:याच दिवशी पांढरे निशाण फडकवले. चौथ्या कसोटीत इंग्लंडकडुन एक डाव 54 धावांनी हरणा:या भारतीय संघाने लाजीरवाणा पराभव कसा मिळवायचा या उत्कृष्ट नमुना पेश केला आहे. केवळ तिस:याच दिवशी सर्वनाश ओढावून घेणारा आणि दोन्ही डावात पन्नास षटकेही खेळू न शकणारा भारतीय संघ  पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना ओव्हल मैदानावर 15 ऑगस्टपासून खेळणार आहे.
ऑफ स्पिनर मोईन अलीच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना पुन्हा एकदा जाळ्यात अडकविले. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळविली आहे. मोईनने 39 धावा देत चार गडी बाद केले. वेगवान अॅन्डरसन आणि ािस जॉर्डन यांनी त्याला साथ देत प्रत्येकी दोन गडी टिपले. भारतीय संघ पहिल्या डावात 215 धावांनी माघारला होता. ही पिछाडी भरुन काढण्याआधीच दुसरा डाव 161 धावांत आटोपला. रवीचंद्रन अश्विनने सर्वाधिक नाबाद 46 धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 27 धावांचे योगदान राहीले. भारताचा दुसरा डाव केवळ 43 षटकांत आटोपला. दुस:या डावाची सुरुवात वाईट झाली. व्होक्सने मुरली विजयला पायचित करीत पहिला अडथळा दूर सारल्यानंतर फलंदाजीला खिंडार पडली. ही पडझड एकाही फलंदाजाला थोपविता आली नाही. विशेष म्हणजे आज लख्ख सुर्यप्रकाश असल्याने खेळाडूंना पहिल्या दिवसासारखे वातावरणाचे लंगडे कारणही सांगता येणार नाही.
त्याआधी भारतीय फलंदाजांच्या नाकर्तेपणाचा लाभ घेत इंग्लंडने 152 धावांवर रोखले होते. प्रत्युत्तरात यजमानांनी 367 धावांर्पयत मजलही गाठली. दुस:या डावात इंग्लंड संघ स्टुअर्ट ब्रॉडविना खेळला. ब्रॉडने पहिल्या डावात 25 धावा देत सहा गडी बाद केले होते. पण मोईन आणि अन्य गोलंदाजांनी ब्रॉडची मुळीच उणिव भासू दिली नाही. ब्रॉड फलंदाजी करीत असताना अॅरोनचा उसळी घेणारा चेंडू त्याच्या नाकावर आदळला होता.त्याआधी इंग्लंडने आज 6 बाद 237 वरुन पुढे खेळ सुरू केला. ज्यो रुट 77 आणि ज्योस बटलर 7क् यांच्या अर्धशतकी खेळीमुळे त्यांनी 367 र्पयत मजल गाठली. सातव्या गडय़ासाठी या दोघांनी 134 धावांची भागीदारी केली.
 
भारत पहिला डाव 152. 
इंग्लंड पहिला डाव :- अॅलिस्टर कुक ङो. पंकज सिंग गो. अॅरोन 17, सॅम रॉबसन त्रि. गो. भुवनेश्वर क्6, गॅरी बॅलन्स पायचित गो. अॅरोन 37, इयान बेल ङो. धोनी गो. भुवनेश्वर 58, ािस जॉर्डन ङो. अॅरोन गो. भुवनेश्वर 13, जो रुट ङो. धोनी गो. पंकज सिंग 77, मोईन अली त्रि. गो. अॅरोन 13, जोस बटलर ङो. पुजारा गो. पंकज सिंग 7क्, ािस व्होक्स नाबाद 26, स्टुअर्ट ब्रॉड जायबंदी निवृत्त 12, जेम्स अॅन्डरसन पायचित गो. जडेजा क्9. अवांतर (29). एकूण 1क्5.3 षटकांत 9 बाद 367. गोलंदाजी : भुवनेश्वर 24-7-75-3, पंकज सिंग 28-5-113-2, अॅरोन 26-4-97-3, आश्विन 14-1-29-क्, जडेजा 13.3-1-36-1.
भारत दुसरा डाव : मुरली विजय पायचित गो. व्होक्स 18, गौतम गंभीर ङो. बटलर गो. अॅन्डरसन 18,  चेतेश्वर पायचित गो. अली 17, विराट कोहली ङो, बेल गो. अॅन्डरसन 7, अजिंक्य रहाणो ङो. आणि गो. अली 1, महेंद्रसिंह धोनी ङो. बॅलेन्स गो. अली 27, रवींद्र जडेजा ङो. जॉर्डन गो. अली 4, आश्विन नाबाद 46, भुवनेश्वर कुमार धावबाद 1क्, वरुण अॅरोन ङो. बटलर गो. जॉर्डन 9, पंकज सिंग त्रि. गो. जॉर्डन क्क्, अवांतर : 4, एकूण 43 षटकांत सर्व बाद 161. बाद क्रम : 1-26, 2/53, 3/53, 4/61, 5 /61, 6/66, 7/1क्5, 8/ 133, 9/ 161, 1क्/ 163. गोलंदाजी : अॅन्डरसन 9-4-18-2, व्होक्स 9-2-37-1, जॉर्डन 12-1-65-2, मोईन अली 13-3-39-4.
 
2011
4बर्मिगहॅम येथे झालेल्या लढतीत इंग्लंडने भारताचा एक डाव 242 धावांनी पराभव केला होता. 
4भारताने प्रथम फलंदाजी करताना 224 धावा केल्या होत्या. ब्रॉड व ब्रेसननने प्रत्येकी चार बळी घेतले होते. इंग्लंडने पहिल्या डावात 71क् धावांचा डोंगर उभा केला होता. त्या डावात अॅलिस्टर कूकने 294 व मॉर्गेनने 1क्4 धावांची दमदार खेळी केली होती.   जेम्स अॅँडरसनने 4 विकेट घेतल्या होत्या. सामना चार दिवसांत आटोपला होता. भारताचा दुसरा डाव 244 धावांत संपुष्टात आला होता.
 
1974
4लॉर्डस् मैदानावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 629 धावा केल्या होत्या. या वेळी त्यांच्या डीएल अमीसने आघाडीला येऊन 188, कर्णधार एमएच डिनेसने 118 व एडब्ल्यू ग्रेगने 1क्6 धावा केल्या होत्या. 
4भारताने पहिल्या डावात 3क्2 धावा केल्या होत्या. भारताकडून फारुख इंजिनिअरने 86 धावांची खेळी केली होती. भारताचा दुसरा डाव अवघ्या 42 धावांत आटोपला होता. भारताकडून गावसकर, वाडेकर, विश्वनाथ, इंजिनिअरसारखे फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नव्हते. इग्लंडकडून जीजी अर्नोल्डने चार व सीएम ओल्डने 5 विकेट घेतल्या होत्या. चार दिवसांत संपलेल्या या सामन्यात भारताचा एक डाव 285 धावांनी दणदणीत पराभव झाला होता. 
 
1952
4मॅँचेस्टर येथे ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात इग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 347 धावा केल्या होत्या. या वेळी एल. हुटोनने आघाडीला येऊन शतक ठोकले होते. भारताचा पहिला डावा अवघ्या 58 धावांत संपुष्टात आला होता. या वेळी भारताचे 9 फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नव्हते. यात तीन जण शून्यावर बाद झाले होते. इंग्लंडकडून एफएस ट्रमनने 31 धावांत 8 विकेट्स घेतल्या होत्या. भारताचा दुसरा डाव 82 धावांत संपला होता. तीन फलंदाज शून्यावर, तर चार फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठण्यात अपयशी झाले होते. हा सामना तीन दिवसांत संपला होता आणि इंग्लंडने एक डाव 2क्7 धावांनी जिंकला होता. 

Web Title: A Dove Dhobi run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.