द्रविड-गांगुलीचा विक्रम इंग्लंडच्या जोडीने मोडला

By admin | Published: June 7, 2016 10:57 PM2016-06-07T22:57:37+5:302016-06-07T22:57:37+5:30

रिकी वेसल्स आणि मायकेल लंबदरम्यान ३४२ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीने भारतीय क्रिकेटपटू सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यांनी केलेला ३१८ धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड मोडला आहे.

Dravid-Ganguly's record was broken by the English pair | द्रविड-गांगुलीचा विक्रम इंग्लंडच्या जोडीने मोडला

द्रविड-गांगुलीचा विक्रम इंग्लंडच्या जोडीने मोडला

Next

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. ७ : रॉयल कप वन डे लिस्ट ए स्पर्धेत नॉटिंगहॅमशायरचे फलंदाज रिकी वेसल्स आणि मायकेल लंबदरम्यान ३४२ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीने भारतीय क्रिकेटपटू सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यांनी केलेला ३१८ धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड मोडला आहे.
ट्रेंटब्रिज मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात नॉर्दम्पटनशायरच्या विरोधात नॉटिंगहॅमशायरचे फलंदाज रिकी वेसल्स आणि मायकेल लंब यांनी ३९.२ षटकांत ३४२ धावांची भागीदारी केली. जी इंग्लंडमधील एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. वेसल्सने ९७ चेंडूंत १४६, तर मायकेलने १८४ धावा केल्या. नाटिंगहॅमशायरने या सामन्यात आठ गड्यांच्या मोबदल्यात ४४५ धावा केल्या. जगातील लिस्ट ए सामन्यातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. या भागीदारीने १९९९ मध्ये विश्वचषकादरम्यान टाँटन येथे गांगुली आणि द्रविड यांनी श्रीलंकेविरोधात केलेल्या ३१८ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Dravid-Ganguly's record was broken by the English pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.