भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सराव सामना अनिर्णित

By Admin | Published: July 17, 2016 10:32 AM2016-07-17T10:32:28+5:302016-07-17T10:32:28+5:30

भारत आणि वेस्ट इंडिज अध्यक्षीय संघामध्ये वॉर्नर पार्क स्टेडियमवर झालेला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित अवस्थेत सुटला.

Drawback against India vs West Indies practice | भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सराव सामना अनिर्णित

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सराव सामना अनिर्णित

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

सेंट किटस, दि. १७ - भारत आणि वेस्ट इंडिज अध्यक्षीय संघामध्ये वॉर्नर पार्क स्टेडियमवर झालेला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित अवस्थेत सुटला. वेस्ट इंडिजच्या सहाबाद २२३ धावा असताना दोन्ही कर्णधारांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. या कसोटीत भारताच्या दृष्टीने अनेक जमेच्या बाजू आहेत. 
 
भारताकडे पहिल्या डावात १८४ धावांची आघाडी होती. कर्णधार विराट कोहली (५१), लोकेश राहुल (६४) आणि रविंद्रा जाडेजा (५६) या तिघांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने ३५० धावांचा टप्पा ओलांडला. आर.अश्विनने प्रभावी फिरकी गोलंदाजी केली. त्याने दोन्ही डावात मिळून एकूण सहा गडी बाद केले. 
 
दुस-या डावात जे ब्लॅकवूडने फक्त (५१) अर्धशतक झळकवले. अश्विनने त्याला क्लीनबोल्ड केले. सराव सामन्यातील हा अनुभव २१ जुलैपासून अँटिग्वा येथे सुरु होत असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला उपयोगी पडणार आहे. 
 
 

Web Title: Drawback against India vs West Indies practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.