फ्रान्सचे स्वप्न साकारले...
By admin | Published: June 4, 2016 02:14 AM2016-06-04T02:14:41+5:302016-06-04T02:14:41+5:30
सातवी युरोपियन चॅम्पियनशिप फ्रान्समध्ये झाली. फ्रान्सचे फुटबॉल पितामह हेन्री डेलौनी यांनी या स्पर्धेचे स्वप्न पाहिले होते. पण, ही स्पर्धा जिंकण्यात त्यांना सातव्या स्पर्धेची वाट पाहावी लागली.
1984
सातवी युरोपियन चॅम्पियनशिप फ्रान्समध्ये झाली. फ्रान्सचे फुटबॉल पितामह हेन्री डेलौनी यांनी या स्पर्धेचे स्वप्न पाहिले होते. पण, ही स्पर्धा जिंकण्यात त्यांना सातव्या स्पर्धेची वाट पाहावी लागली.
स्पर्धेचे स्वरुप बदलण्याची प्रक्रिया याही स्पर्धेत सुरूच राहीली. पात्रता फेरीतील सात आणि यजमान संघ असे आठ संघ पुढे आल्यानंतर त्यांची विभागणी दोन गटांत करण्यात आली. गटातंर्गत सामने खेळून प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ बाद फेरीत दाखल झाले. या चार संघांमध्ये सेमि फायनलचे सामने रंगले. (१९८0च्या स्पर्धेत सेमिफायनल झाली नव्हती.) सेमिफायनलच्या विजेत्यांमध्ये रंगली अंतिम झुंज. तिसऱ्या क्रमांकासाठी होणारे सामने या स्पर्धेपासून बंद करण्यात आले.
यजमान फ्रान्ससह बेल्जीयम, डेन्मार्क, पोर्तुगाल, रोमानिया, स्पेन, युगोस्लोव्हिया आणि पश्चिम जर्मनी हे आठ संघ पात्रता फेरीतून पुढे आले. सेमीफायनलसाठी ‘अ’ गटातून फ्रान्स आणि डेन्मार्क तर ‘ब’ गटातून स्पेन आणि पोर्तुगाल पात्र ठरले. फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्यात रंगलेला सेमिफायनलचा सामना हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट सामन्यापैकी एक समजला जातो. हा सामना ३-२ने जिंकत फ्रान्सने यात बाजी मारली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पेन आणि डेन्मार्क यांची जादा वेळेतही १-१ अशी कोंडी न फुटल्याने पेनाल्टी शूटआउटवर सामन्याचा निकाल ठरवण्यात आला. या स्पेनने 5-4 अशी बाजी मारुन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामना मात्र फ्रान्सने २-0 असा एकतर्फी जिंकला आणि पहिल्यांदा युरोपियन चॅम्पियनशिप मिळवली. फ्रान्सचा कर्णधार मायकेल प्लाटिनी याने या स्पर्धेत ९ गोल नोंदविले.