स्वप्न पूर्ण झाले : सानिया

By admin | Published: July 15, 2015 01:13 AM2015-07-15T01:13:00+5:302015-07-15T01:13:00+5:30

जगातील पहिल्या क्रमांकाचा महिला दुहेरीतील खेळाडू आणि विम्बल्डन महिला दुहेरीतील विजेती सानिया मिर्झा मंगळवारी भारतात परतली आहे.

Dream is over: Sania | स्वप्न पूर्ण झाले : सानिया

स्वप्न पूर्ण झाले : सानिया

Next

हैदराबाद : जगातील पहिल्या क्रमांकाचा महिला दुहेरीतील खेळाडू आणि विम्बल्डन महिला दुहेरीतील विजेती सानिया मिर्झा मंगळवारी भारतात परतली आहे. विम्बल्डन जिंकून आपले स्वप्न पूर्ण झाले असल्याचे तिने म्हटले आहे.
हैदराबादला पोहोचल्यावर सानिया म्हणाली, की विम्बल्डनचा किताब जिंकल्यावर आपण खूप खूश आहोत. माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी हे एक स्वप्न जिंकल्यासारखे आहे. सानियाने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस हिच्यासोबत वर्षातील तिसरे ग्रॅण्डस्लॅम जिंकले आहे. देशातील नंबर एक टेनिस खेळाडू सानियाचे हैदराबाद विमानतळावर स्वागत झाले. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना सानिया म्हणाली, की या विजयाचा आनंद मला सगळ्यांसोबत घ्यायचा. माझा आणि माझ्या कुटुंबाचा हा खूूप मोठा विजय आहे. सानियाने पहिल्यांदाच महिला दुहेरीतील ग्रॅण्डस्लॅम जिंकले आहे. या आधीही सानियाने मिश्र दुहेरीत आॅस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, आणि यु.एस.ओपनचे विजेतेपद पटकावले होते.(वृत्तसंस्था)

Web Title: Dream is over: Sania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.