लंका-पाक कसोटीत डीआरएस वाद

By admin | Published: June 27, 2015 12:50 AM2015-06-27T00:50:21+5:302015-06-27T00:50:21+5:30

पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीत गुरुवारी टीव्ही पंच पॉल रॅफेल यांच्या चुकीचा फटका बसला. संघाने एक रिव्ह्यूदेखील गमावला.

DRS controversy in Lanka-Pak Test | लंका-पाक कसोटीत डीआरएस वाद

लंका-पाक कसोटीत डीआरएस वाद

Next

कोलंबो : पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीत गुरुवारी टीव्ही पंच पॉल रॅफेल यांच्या चुकीचा फटका बसला. संघाने एक रिव्ह्यूदेखील गमावला. त्यानंतर शुक्रवारी एका अतिरिक्त रिव्ह्यूचा पर्याय देण्यात आला. पी. सारा ओव्हल मैदानावर पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान ही घटना घडली.
पाकचा गोलंदाज झुल्फिकार बाबरच्या चेंडूवर कौशल सिल्वाविरुद्ध स्लिपमध्ये झेलबादचे अपील मैदानी पंच रवी सुंदरम यांनी फेटाळून लावताच रिव्ह्यू मागण्यात आला होता. रिप्ले पाहिल्यानंतर आॅस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज आणि या सामन्यात तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत असलेले रॅफेल यांनी पंचाचा निर्णय योग्य ठरविला. चेंडू बॅटला चाटून गेला नव्हता, असे पंचांचे मत होते. हा वाद येथेच थांबला नाही. डीआरएस (पंचांच्या निर्णयाची समीक्षा करणारी प्रणाली) अंतर्गत स्रिकोमीटर किंवा हॉटस्पॉटची मदतही घेण्यात आली नाही. पण, रिप्लेतून असाही तोडगा पुढे आला, की चेंडू बॅटला लागला नसेल तर फलंदाज पायचीत असावा, कारण चेंडू पॅडला लागला नसता तर यष्टिवर आदळला असता.
 

Web Title: DRS controversy in Lanka-Pak Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.