दुबई टेनिस स्पर्धा : बोपन्ना-माटकोव्हस्की अंतिम फेरीत
By admin | Published: March 3, 2017 08:00 PM2017-03-03T20:00:02+5:302017-03-03T21:01:40+5:30
भारताचा टेनिसपटू रोहण बोपन्ना आणि पोलंडचा त्याचा जोडीदार मार्सिन माटकोव्हस्की यांनी लियांडर पेस-गुलेर्मो गार्सिया लोपेझ यांच्यावर तीन सेटमध्ये मात करीत
Next
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 03 - भारताचा टेनिसपटू रोहण बोपन्ना आणि पोलंडचा त्याचा जोडीदार मार्सिन माटकोव्हस्की यांनी लियांडर पेस-गुलेर्मो गार्सिया लोपेझ यांच्यावर तीन सेटमध्ये मात करीत शुक्रवारी दुबई ड्युटी फ्री टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
बोपन्ना-माटकोव्हस्की या बिगरमानांकित जोडीने पेस-लोपेझ यांच्या भारत-स्पेनच्या जोडीवर उपांत्य सामन्यात ६-३, ३-६, १०-६ ने विजय नोंदविला. यंदाच्या मोसमातील बोपन्नाची ही दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यंदा त्याने चार जोडीदार बदलले. काही महिन्यांपूर्वी सहकारी जीवन नेदुंचेझियनसोबत त्याने चेन्नई ओपनचे जेतेपद पटकविले होते.
अंतिम लढतीत बोपन्ना- माटकोव्हस्की यांची गाठ हेन्री कोटिनेन- जॉन पियर्स ही अव्वल मानांकित जोडी तसेच रॉजर ज्युलियन- होरिया तेकाऊ या चौथ्या मानांकित जोडीदरम्यान होणा-या दुस-या उपांत्य सामन्यातील विजेत्या जोडीविरुद्ध पडणार आहे.