भारताचे चायना मास्टर्समधील आव्हान संपुष्टात
By admin | Published: April 23, 2016 04:10 AM2016-04-23T04:10:40+5:302016-04-23T04:10:40+5:30
चौथे मानांकन प्राप्त भारताची खेळाडू पी. व्ही. सिंधू, सातवा मानांकित एच. एस. प्रणय आणि ज्वाला गट्टा - अश्विनी पोनाप्पा यांच्या पराभवासोबतच भारताचे चायना मास्टर्समधील आव्हान संपुष्टात आले आहे.
जियांगसू : चौथे मानांकन प्राप्त भारताची खेळाडू पी. व्ही. सिंधू, सातवा मानांकित एच. एस. प्रणय आणि ज्वाला गट्टा - अश्विनी पोनाप्पा यांच्या पराभवासोबतच भारताचे चायना मास्टर्समधील आव्हान संपुष्टात आले आहे.
चौथी मानांकित सिंधूला थायलंडच्या पोर्नटिप बुराना प्रासर्तसुकने ३८ मिनिटांत पराभूत करीत उपांत्य फेरीत जागा पटकावली. बुराना प्रासर्तसुकने गेल्या वर्षी आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत केले. विश्व रँकिंगमध्ये ३० व्या क्रमांकावर असलेल्या प्रणय याला पुरुष एकेरीत जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू चीनचा चेन लोंग याने ४६ मिनिटांत पराभूत केले. चेनने प्रणयला २१-१०,२१-१५ ने पराभूत केले. चेनविरोधात आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने प्रणयने गमावले आहेत. महिला दुहेरी सामन्यात ज्वाला आणि अश्विनी या जोडीला प्रथम मानांकित लुयो लिंग आणि लुयो यू यांनी ३९ मिनिटांत २१ -११, २१-१४ असे पराभूत केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.