जीतूच्या आव्हान संपुष्टात
By admin | Published: August 10, 2016 09:12 PM2016-08-10T21:12:10+5:302016-08-10T21:26:07+5:30
शेवटच्या राऊंडमध्ये (दहा शॉटची एक सिरीज) क्रमांकामध्ये सहाव्या, पाचव्या, चौथ्या, आठव्या क्रमांकावर चढताराचा खेळचा होत असतानाच जीतू रायला पुरूषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात एकदम
Next
>- शिवाजी गोरे
(थेट रियो येथून)
शेवटच्या राऊंडमध्ये (दहा शॉटची एक सिरीज) क्रमांकामध्ये सहाव्या, पाचव्या, चौथ्या, आठव्या क्रमांकावर चढताराचा खेळचा होत असतानाच जीतू रायला पुरूषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात एकदम १२ व्या क्रमांकावर आल्यामुळे त्याच्या अंतिम फेरीतील प्रवेशाला येथे सुरु असलेल्या हवेने खिळ घातली. त्यामुळे पदकाची आशा संपूष्टात आली.
डिओडोरा स्टेडियमच्या शूटिंग रेंजमध्ये बुधवारी सकाळ जागतिक क्रमवारीत तिसºया क्रमांकावर असलेला जीतू राय भारताच्या पदकांचा दुष्काळ संपवेल या अपेक्षेणे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्याचा या मुख्या इव्हेंटला सुरुवातीच्या पहिल्या चार राऊंड पर्यंत जीतू १२, १०, ११ आशा क्रमांकावर फिरत होता. पाचव्या राऊंडला तो सातत्याने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर होता. त्याने पहिल्या पाच राऊंहमध्ये ९२, ९५, ९०, ९४ व ९५ अशी गुणांची कमाई केली होती. पण, शेवटच्या सहाव्या राऊंडमध्ये त्याला त्याच्या नशिबाने हुलकावणी दिली. येथे सुरु असलेल्या हवेने त्याचा घात केला. चौथ्या क्रमांकावरून तो एकदम ८ व्या वर आला. त्यानंतर पुन्हा चौथ्यावर होता. नंतर ५२८.९ गुणांसह सातव्या क्रमांकावर होता. नंतर हवेच्या जोराने त्याला लक्ष्या साधता न ौल्यामुळे त्याच्या गुणांमध्ये सुध्दा फरक पडत गेला. त्याने यावेळी ७, ७, ८, ८, १०, ७१ अशी गुण संपादन केल्यामुळे त्याला एकदम १२ व्या क्रमांकावर यावे लागले. याच वेळी त्याच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा धुसर झाल्या होत्या. त्यातच मुख्या पंचांनी शेवटची तीन मिनिटे राहिली असल्याची घोषणा केली. आणि भारतीयांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले. शेवटी आज सुध्दा जीतूला पदकाने हूलकावणी दिली.या राऊंडला त्याने एकूण ८८ गुणांचे लक्ष साधले होते. त्याला शेवटी ५५४.९ गुणांवर समाधान मानावे लागले. क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये प्रत्येक नेमबाजाने १.३० तासात ६० शॉट मारायचे असतात.
जीतू अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही म्हणजे भारतीय संघाला खूप मोठा धक्का आहे. तो या ५० मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारीत तिसºया क्रमांकावर आहे.१० मीटरमध्ये तर तो नशिबाने अंतिम फेरीत गेला. पण आज आम्हला त्याच्याकडून नक्कीच पदकाची खात्री होती. शेवटच्या फेरीत तो येते सुरु झालेल्या जोरदार हवेमुळे आपले लक्ष योग्य पध्दतीने साधू शकला नसेल. पण जर तो अंतिम फेरीत पोहोचला असता तर त्याने नक्की पदक जिंकले असते कारण तो चांगला फिनिशर आहे. शेवटी आपण याला नशिबचा खेलच म्हणू शकतो.
रनिंदर सिंग, अध्यक्ष भारतीय राईफल महासंघ