जोखीम पत्करल्यामुळे इथपर्यंत मजल
By Admin | Published: August 20, 2015 11:35 PM2015-08-20T23:35:55+5:302015-08-20T23:35:55+5:30
यंदा सर्व संघांनी गेल्या वेळच्या तुलनेत सरस खेळ केला. मी कशाबाबत चर्चा करीत आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता. सर्व संघ या वेळी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आक्रमक खेळ करीत आहेत
मनजित चिल्लर लिहितो...
यंदा सर्व संघांनी गेल्या वेळच्या तुलनेत सरस खेळ केला. मी कशाबाबत चर्चा करीत आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता. सर्व संघ या वेळी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आक्रमक खेळ करीत आहेत. माझ्या मते आक्रमक खेळाचा अर्थ जोखीम पत्करण्याबाबत आहे. जर आम्ही ती पत्करली नसती तर स्पर्धेत येथपर्यंत मजल मारणे शक्य नव्हते. आम्ही काही सामने जिंकले आणि जिंकण्याची शक्यता असताना काही सामने गमावले. आम्ही जोखीम पत्करल्यामुळे हे सर्व घडले. अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी पुन्हा एकदा जोखीम पत्करण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे आम्हाला लाभ झाला असून, संघ म्हणून आमच्यासाठी हा यशाचा मंत्र ठरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आमच्या संघात ताळमेळ असल्यामुळे कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. त्यामुळे आम्हाला चांगल्या रणनीतीची कल्पना आली. मी आमच्या प्रशिक्षकाचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले.
उपांत्य लढत प्रो-कबड्डी लीगमधील सर्वांत महत्त्चाची लढत आहे. लीग फेरीत पराभव स्वीकारावा लागला तरी कामगिरी सुधारण्याची संधी असते; पण उपांत्य फेरीत मात्र पराभव स्वीकारावा लागला तर आव्हान संपुष्टात येते. उपांत्य लढतीत दडपण असते. जर उपांत्य लढतीत विजय मिळविला तर अंतिम लढतीत कुठलेच दडपण राहत नाही. उपांत्य फेरीत आम्हाला तेलुगू टायटन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हा संघ चमकदार कामगिरी
करीत आहे. त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे; पण आम्ही त्यांच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. लीग फेरीत जे काही घडले तो आता इतिहास आहे. आम्ही टायटन्सविरुद्ध आक्रमक खेळ करण्यास सज्ज आहोत.
उपांत्य फेरीत चारही संघांवर सारखे दडपण राहील. आमच्या संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश असून, ते दडपण झुगारण्यास वाक् बगार आहेत. मी स्वत: दडपण झुगारण्यासाठी सज्ज आहे. आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, विशेषत: चढाई करताना. यंदा आमच्या संघात दोन नवे बचावपटू व चढाई करणारे काही नवे खेळाडू आहेत. आम्ही चढाईमध्ये आमची बाजू मजबूत केली असून, त्यामुळे अन्य संघांच्या तुलनेत आम्ही वरचढ आहोत. त्यामुळे आम्ही अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज आहोत. (टीसीएम)