'विराट' खेळीमुळे पुण्याचा 7 विकेट्सने पराभव

By admin | Published: May 7, 2016 07:43 PM2016-05-07T19:43:24+5:302016-05-07T19:43:24+5:30

रायझिंग पुणे सुपरजायंट्सने दिलेलं 192 धावांचं लक्ष्य विराटने केलेल्या तुफान खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सहज विजय मिळवला

Due to Virat, Pune defeated Pune by seven wickets | 'विराट' खेळीमुळे पुण्याचा 7 विकेट्सने पराभव

'विराट' खेळीमुळे पुण्याचा 7 विकेट्सने पराभव

Next
>ऑनलाइन लोकमत - 
बंगळुरु, दि. 07 - रायझिंग पुणे सुपरजायंट्सने दिलेलं 192 धावांचं लक्ष्य विराटने केलेल्या तुफान खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सहज विजय मिळवला. विराट कोहलीने 58 धावात 108 धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. बंगळुरुने 3 बॉल राखत फक्त 3 विकेट्स गमावून 192 धावांचं आव्हान पुर्ण करत विजय मिळवला. विराट कोहलीने कप्तानी खेळी करत शतक पुर्ण केलं. हा सामना म्हणजे धोनी- विराटच्या नेतृत्वगुणांची ‘परीक्षा’ मानला जात होता ज्यामध्ये विराटने बाजी मारली आहे.
 
विराट कोहलीने लोकेश शर्मासोब पहिल्या विकेटसाठी 94 धावांची पार्टनरशिप केली. सुरुवातीपासूनच बंगळुरुने आक्रमक पवित्रा घेतला होता. लोकेश शर्माची विकेट गेल्यानेतर विराट कोहलीला शेन वॉट्सनने साथ दिली. शेन वॉट्सनने ताबडतोब फलंदाजी करत 13 चेंडूत 36 धावा केल्या. आर पी सिंगने शेन वॉट्सनला पायचीत केले. पुण्याच्या फलंदाजींनी चांगली कामगिरी केली असताना गोलंदाज निष्प्रभ ठरले. विराट कोहली गोलंदाजांवर वरचढ ठरल्याने पुण्याचा पराभव झाला. आर पी सिंगला एक विकेट आणि अॅडमने दोन विकेट्स घेतल्या. 
 
बंगळुरुने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पुण्याने दमदार सुरुवात करत सुरुवातीपासून बॉलर्सना हिट करण्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. 26 धावांवर पहिली विकेट गेली असताना दुस-या विकेटसाठी अजिंक्य रहाणे आणि सौरभ तिवारीने 106 धावांची पार्टरनशिप केली. सौरभ तिवारीने 39 बॉलमध्ये 52 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 48 बॉलमध्ये 74 धावा केल्या. 
 
पुणे 200 धावा सहज करेल असं वाटल असताना शेवटच्या ओव्हर्समध्ये झटपट विकट गेल्याने पुण्याने बंगळुरुला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये पुणे फक्त 29 धावा करु शकलं. शेन वॉट्सनने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 ओव्हर्समध्ये फक्त 24 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. शेन वॉट्सनने धोनी आणि रहाणेच्या महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
 

Web Title: Due to Virat, Pune defeated Pune by seven wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.