दुती चंदने मिळवलं रिओ ऑलिम्पिकचं तिकिट

By admin | Published: July 11, 2016 05:55 PM2016-07-11T17:55:13+5:302016-07-11T17:55:13+5:30

राष्ट्रीय चॅम्पिअन धावपटू दुती चंदने रिओ ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलं आहे. महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी दुती चंदने रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं

Dune Chandan got the Rio Olympics ticket | दुती चंदने मिळवलं रिओ ऑलिम्पिकचं तिकिट

दुती चंदने मिळवलं रिओ ऑलिम्पिकचं तिकिट

Next
>ऑनलाइन लोकमत 
अलमाटी (कझाकिस्तान). दि. 25 - राष्ट्रीय चॅम्पिअन धावपटू दुती चंदने  रिओ ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलं आहे. महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी दुती चंदने रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. महिलांना रिओ ऑलिम्पिकमच्या 100 मीटर स्पर्धेत क्वालिफाय करण्यासाठी 11.32 सेकंदाची वेळमर्यादा ठेवण्यात आली होती. दुती चंदने 11.30 सेकंदात अंतर पार करत रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. रिओ ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय करणारी दुती चंद 99वी खेळाडू ठरली आहे.
दुती चंदने कझाकिस्तानमधील अलमटी येथे पार पडलेल्या 26व्या आंतरराष्ट्रीय झी कोसानोव्ह मेमोरिअल स्पर्धेत 11.30 सेकंदात 100 मीटर अंतर पार केलं. विशेष म्हणजे 1980मध्ये पीटी उषाने 100 मीटर स्पर्धेत ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलं होतं. भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणारी धावपटू म्हणजे पी.टी. उषानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत क्वालिफाय करणारी दुती चंद दुसरी महिला धावपटू ठरली आहे.  5 ऑगस्टपासून रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे.

Web Title: Dune Chandan got the Rio Olympics ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.