Shocking : भारताच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजाचे रस्ता अपघातात निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 02:36 PM2020-06-01T14:36:41+5:302020-06-01T14:37:22+5:30
गाडीची अवस्था पाहून कळतेय भिषणता
भारताचा आंतरराष्ट्रीय तिरंदाज जयंतीलाल ननोमा यांचे रविवारी रात्री रस्ता अपघातात निधन झाले. राजस्थानच्या क्रीडा क्षेत्रासाठी हा मोठा धक्काच आहे. जयंतीलाल ननोमा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत अनेक सुवर्ण व रौप्यपदक जिंकली आहेत. त्यानं 2013, 2015 आणि 2018मध्ये भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षकपदही भूषविले आहे. ननोना हे राजस्थान येथील डूंगरपूर जिल्ह्यात क्रीडा अधिकारी म्हणून काम करत होते.
लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी त्यानं चोरली बाईक; त्यानंतर जे केलं ते भारीच होतं!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंतीलाल रविवारी रात्री आपल्या सहकारी शिक्षक कांतिलाल यांच्यासह बांसपाडा येथून डुंगरपूर येथे परतत होते. तेव्हा सागवाडा रोडवर एका पुलापाशी गाडीवर नियंत्रण सुटला आणि त्यांची गाडी पलटी झाली. अपघातात जयंतीलाल यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि प्रचंड रक्त वाहिलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जयंतीलाल आणि कांतिलाल यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण, जयंतीलाल यांना उदयपूर येथे नेण्यास सांगितले आणि तिथे पोहोचताच त्यांचं निधन झाले.
डुंगरपूर येथील बिलडी गावातील आदिवासी परिवारात जन्मलेल्या जयंतीलाल एक उत्कृष्ट तिरंदाज होते. दक्षिण अमेरिका येथे झालेल्या वर्ल्ड कप तिरंदाजी स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संघाचा ते सदस्य होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
WWE स्टार खेळाडूनं घेतला जगाचा निरोप; दोन महिन्यांपूर्वी झालेलं पत्नीच निधन
नताशाच्या 'बेबी शॉवर'ला हार्दिक पांड्याची फुल्ल टू धमाल; फोटो व्हायरल
हार्दिक-नताशा यांनी Good News दिली, विरुष्काची डोकेदुखी वाढली; पाहा भन्नाट मीम्स!
विराट कोहलीला घाबरत नाही; पाकिस्तानच्या 17 वर्षीय गोलंदाजानं दिलं चॅलेंज
Video : युवराज सिंगच्या 'किचन 100' चॅलेंजला सचिन तेंडुलकरचं दमदार उत्तर