माझ्या यशस्वी वाटचालीत डुंगरपूरांचा मोठा वाटा - सचिन

By admin | Published: July 26, 2014 01:09 AM2014-07-26T01:09:46+5:302014-07-26T10:03:31+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बीसीसीआय प्रमुख व क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिवंगत राज सिंह डुंगरपूर यांच्यावर आधारित पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावली.

Dungarpura's big share in my successful journey - Sachin | माझ्या यशस्वी वाटचालीत डुंगरपूरांचा मोठा वाटा - सचिन

माझ्या यशस्वी वाटचालीत डुंगरपूरांचा मोठा वाटा - सचिन

Next
विनय नायडू - मुंबई 
हैदराबाद येथून दोन तासांचा प्रवास करून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मुंबईत बीसीसीआय प्रमुख आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिवंगत राज सिंह डुंगरपूर यांच्यावर आधारित पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावली. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अनेक मान्यवरांनी डुंगरपूरांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सचिन म्हणाला, हैदराबादवरून येथे येताना माझ्यावर जे तणाव होते, ते याआधी कधी मला जाणवले नाही. मी कार्यक्रमात बदल करण्याचे ठरविले होते, परंतु येथे येता आले याचा आनंद वाटतो. राजभाई यांनी माझ्या यशात  महत्त्वाची भूमिका बजावली आहे, याची जाण मला आहे.
1989च्या पाकिस्तान दौ:यात तेंडुलकरची भारतीय संघात निवड झाली ती डुंगरपूर यांच्या आग्रहामुळेच. त्यांनी माझ्याकरिता सीसीआयच्या नियमात बदल केले आणि त्यामुळेच 16व्या वर्षी मी खेळू शकलो. त्यांनी कैलास गत्तानी सरांना मला स्टार क्रिकेट क्लबसहच्या इंग्लंड दौ-यावर नेण्यास सांगितले. माझ्याकडे त्यावेळी पैसे नव्हते, राजभाई यांनी माझ्यासाठी प्रायोजक शोधला. 
1988 साली मी मुंबई रणजी संघात खेळत असताना उपांत्य फेरीच्या सामन्यात ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, वेस्ट इंडिज दौ:यासाठी मी तुझी संघात निवड करू इच्छितो परंतु, तू रणजी चषकावर लक्ष केंद्रित कर आणि एसएसची परीक्षा दे. 
 

 

Web Title: Dungarpura's big share in my successful journey - Sachin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.