पुणेरी पलटणचा ‘बुल्स’ला दणका

By admin | Published: February 15, 2016 03:25 AM2016-02-15T03:25:00+5:302016-02-15T03:25:00+5:30

घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवताना पुणेरी पलटणने बंगळुरु बुल्सला २९-२७ असा धक्का देत प्रो कबड्डीच्या गुणतालिकेत १९ गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली

Dunka of Puneri Paltan's 'Bulls' | पुणेरी पलटणचा ‘बुल्स’ला दणका

पुणेरी पलटणचा ‘बुल्स’ला दणका

Next

पुणे : घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवताना पुणेरी पलटणने बंगळुरु बुल्सला २९-२७ असा धक्का देत प्रो कबड्डीच्या गुणतालिकेत १९ गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली. त्याचवेळी याआधी झालेल्या सामन्यात यू मुंबाने दणदणीत बाजी मारताना बंगाल वॉरियर्सचे तगडे आव्हान ३२-२१ असे सहजरीत्या परतावून इतर संघांना धोक्याचा इशारा दिला.
बंगळुरुने अपेक्षित आक्रमक सुरुवात केल्यानंतर पुणेकरांनी सामन्यात बरोबरी साधून बंगालवर आघाडी घेतली. यावेळी पुण्याने चढाई व पकडीमध्ये चमक दाखवत मध्यंतराला १८-१० अशी आघाडी घेतली. यानंतर बंगळुरुने जबरदस्त पुनरागमन केले. अखेरच्या मिनिटाला पुण्याकडे एका गुणाची आघाडी असताना कर्णधार मनजीत चिल्लरने निर्णायक यशस्वी चढाई करुन संघाच्या विजयावर शिक्का मारला. लक्षवेधी खेळ केलेल्या चिल्लरला सुरेंद्र सिंगच्या खोलवर चढायांची साथ मिळाली. आशिष सांगवान व श्रीकांत तेवठीया बंगळुरुचा पराभव टाळण्यात अपयशी ठरले.
तत्पूर्वी यू मुंबाने सध्या फॉर्ममध्ये असलेल्या बंगाल वॉरियर्सचा ३२-२१ असा पाडाव केला. संघातील चार प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत गतविजेता यू मुंबा अडचणीत येणार, अशी चर्चा होती. मात्र रिशांक देवाडिगाने आक्रमणाची सर्व सूत्रे स्वत:कडे घेत बंगाल वॉरियर्सचे तगडे आव्हान परतविण्यात मोलाचे योगदान दिले. रिशांकने १० गुणांची कमाई करून बंगालच्या आव्हानातली हवा काढली. मध्यंतरानंतर यू मुंबाने बंगालवर दोन लोण चढवले. २८व्या मिनिटाला १६-१६ अशी बरोबरी असताना मुंबईने तुफान खेळ करून ३०-२० अशी भक्कम आघाडी घेत विजय स्पष्ट केला. रिशांकच्या आक्रमक व खोलवर चढाया आणि जीवा कुमार, फझल अत्राचली यांच्या दमदार पकडी मुंबईच्या विजयात निर्णायक ठरल्या.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Dunka of Puneri Paltan's 'Bulls'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.