डीवाय पाटील स्टेडियम सज्ज
By admin | Published: June 28, 2017 12:46 AM2017-06-28T00:46:47+5:302017-06-28T00:46:47+5:30
फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी १०० दिवस शिल्लक राहिले असताना स्थानिय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी १०० दिवस शिल्लक राहिले असताना स्थानिय आयोजन समितीचे (एलओसी) निर्देशक झेवियर सिप्पी यांनी नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमला सामने आयोजनासाठी पुर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. भारतात होणाऱ्या ज्या सहा स्टेडियमवर विश्वचषक फुटबॉलचे सामने होणार आहेत, त्यामध्ये डीवाय पाटील स्टेडियमचा समावेश आहे.
एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे सिप्पी यांनी सांगितले की, ‘येथील अखेरच्या सराव मैदानाला तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून हे काम लवकरंच पुर्ण होण्याची चिन्हे आहेत. डीवाय पाटील स्टेडियम सामने आयोजित करण्यासाठी जवळपास सज्ज आहे. तसेच, येथे आणखी काही नवीन सुविधा करण्यात येत आहेत, जेणेकरुन येथे आणखी चांगल्या सुविधा उपलबध्द होतील. फीफा अधिकाऱ्यांनी कोच्ची येथील जवाहरलाल नेहरु आंतरराष्ट्रीय स्टेडियमचीही पाहणी केली.