भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेची ई-तिकीटविक्री

By admin | Published: August 21, 2015 10:43 PM2015-08-21T22:43:17+5:302015-08-21T22:43:17+5:30

आगामी आॅक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन महिन्यांच्या दौऱ्यावर येणार असून, त्यामध्ये आफ्रिकेचा संघ भारताविरुद्ध ३ टी-२०, ५ एकदिवसीय

E-ticket sale of India-South Africa series | भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेची ई-तिकीटविक्री

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेची ई-तिकीटविक्री

Next

कानपूर : आगामी आॅक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन महिन्यांच्या दौऱ्यावर येणार असून, त्यामध्ये आफ्रिकेचा संघ भारताविरुद्ध ३ टी-२०, ५ एकदिवसीय आणि ४ कसोटी सामने खेळेल. टी-२० मालिकेनंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिलाच सामना कानपूर येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर ११ आॅक्टोबरला होणार असून, या सामन्यासाठी प्रथमच आॅनलाइन तिकिटांची विक्री होणार आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातील एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असलेल्या ग्रीनपार्कवर तब्बल दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार असल्याने क्रिकेटचाहत्यांची गर्दी या सामन्यात पाहायला मिळेल.
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजीव शुक्ला म्हणाले, की काऊंटर तिकीटविक्रीसह क्रिकेटप्रेमींसाठी आॅनलाईन विक्रीचा पर्याय उपलब्ध करून देणार आहोत.

Web Title: E-ticket sale of India-South Africa series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.