वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये आठ भारतीयांना पात्रता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 02:46 AM2017-07-23T02:46:24+5:302017-07-23T02:46:24+5:30
बॅडमिंटनमध्ये महाशक्ती होण्याच्या दिशने वाटचाल करीत असलेल्या भारताला पुढील महिन्यात होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पुरुष व महिला एकेरीमध्ये चार
क्वालालम्पूर : बॅडमिंटनमध्ये महाशक्ती होण्याच्या दिशने वाटचाल करीत असलेल्या भारताला पुढील महिन्यात होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पुरुष व महिला एकेरीमध्ये चार पात्रता स्थान मिळाले आहेत.
भारताने महिला एकेरीचे सर्व चारही कोटा स्थान मिळविले आहेत. राष्ट्रीय चॅम्पियन रितूपर्णा दास व तन्वी लाड यांच्यासह पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी कोटा स्थान मिळविले आहेत. भारत, चीन व जपान याच देशांना महिला एकेरीमध्ये चार कोटा स्थान मिळाले आहेत.
पुरुष एकेरीत सैयद मोदी आंतरराष्ट्रीय चॅम्पियन समीर वर्मासह अजय जयराम, किदाम्बी श्रीकांत व साई प्रणीत यांनी पात्रता मिळविली आहे. चीन, डेन्मार्क व हाँगकाँग यांनीही चार पात्रता स्थान मिळविली आहेत. चीनच्या संघात गत चॅम्पियन चेन लोंग, लिन डॅन, शी युकी व तियान हुवेई यांचा समावेश आहे. डेन्मार्क संघात एंडर्स एंटोंसेन, व्हिक्टर एक्सेलसन, यान ओ योर्गेंसेन व हँस ख्रिस्टयन व विटिंगुस यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
चीनला पाचपैकी चार कोटा स्थान मिळाले आहेत. बीडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियनशिप ग्लास्गोमध्ये २१ ते २७ आॅगस्ट या कालावधीत खेळल्या जाणार आहे.