एस्लीवर आठ वर्षांची बंदी; ऑलिम्पिक पदकही काढून घेणार

By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:14+5:302015-08-18T21:37:14+5:30

लुसाने : तुर्कीची ऑलिम्पिक पदकविजेती धावपटू एस्ली काकिर एल्पटेकिन हिच्याकडून दुसर्‍यांदा डोपिंग नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल क्रीडा लवादाने कडक पावले उचलून तिच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली असून तिचे ऑलिम्पिक पदकही काढून घेण्यात येणार आहे. जानेवारी २०२१ पर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

Eislei's eight-year ban; Olympic medal will be taken out | एस्लीवर आठ वर्षांची बंदी; ऑलिम्पिक पदकही काढून घेणार

एस्लीवर आठ वर्षांची बंदी; ऑलिम्पिक पदकही काढून घेणार

Next
साने : तुर्कीची ऑलिम्पिक पदकविजेती धावपटू एस्ली काकिर एल्पटेकिन हिच्याकडून दुसर्‍यांदा डोपिंग नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल क्रीडा लवादाने कडक पावले उचलून तिच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली असून तिचे ऑलिम्पिक पदकही काढून घेण्यात येणार आहे. जानेवारी २०२१ पर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.
क्रीडा लवादाने सांगितले, की एस्लीने ऑलिम्पिक आणि युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेली पदके परत देण्याची तयारी दर्शविली आहे. २९ वर्षीय एस्लीने २००४ मध्ये पहिल्यांदा डोपिंग नियमांचे उल्लंघन केले होते, तेव्हा तिच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर जुलै २०१० ते ऑक्टोबर २०१२ या काळात एस्लीच्या रक्ताचे नमुने संशयास्पद आढळले होते. त्यामुळे तिच्यावर २०१३ मध्ये बंदी घालण्यात आली होती. डिसेंबर २०१३ मध्ये तुर्की ॲथलेटिक्स संघाने तिच्यावरील बंदी उठविली, त्यामुळे आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघाने सीएएसमध्ये अपील केली होती.
क्रीडा लवादाचे कैस यांनी सांगितले, की सुनावणीच्या अगोदरच दोन्ही पक्षांनी बातचीत केली आणि सहमतीने तोडगा काढण्यास मान्यता दिली. त्यानुसार एस्लीला जुलै २०१० नंतर जिंकलेली सर्व पदके परत करावी लागणार आहेत. यामध्ये तिला २०१२ चे लंडन ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक आणि २०१२ चा युरोपियन चॅम्पियनशिप किताब परत करावा लागणार आहे. (वृत्तसंस्था)
==================
०००००

Web Title: Eislei's eight-year ban; Olympic medal will be taken out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.