पात्रता शर्यतीकडे लक्ष कायम
By admin | Published: June 6, 2016 02:30 AM2016-06-06T02:30:10+5:302016-06-06T02:30:10+5:30
भारताची जोना मुर्मु, आश्विनी अकुंजी, अनिल्डा थॉमस आणि एम. आर. पूवम्मा यांचा समावेश असलेल्या महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाने पीटीएस अॅथलेटिक्स ग्रांप्री स्पर्धेत
सॅमोरिन : भारताची जोना मुर्मु, आश्विनी अकुंजी, अनिल्डा थॉमस आणि एम. आर. पूवम्मा यांचा समावेश असलेल्या महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाने पीटीएस अॅथलेटिक्स ग्रांप्री स्पर्धेत ३१.३९ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकत रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याची आशा कायम राखली आहे. या कामगिरीनंतर रिले संघाला आॅलिम्पिकसाठी पात्रता गाठण्याचे दोन पर्याय आहेत. बहामाच्या नसाऊमध्ये गेल्या वर्षी आयएएएफ विश्व रिलेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अव्वल आठ संघांचा थेट आॅलिम्पिकसाठी प्रवेश निश्चित झाला आहे.
उर्वरित आठ स्थानांसाठी
१ जानेवारी २०१५ ते ११ जुलै २०१६
या कालावधीत आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत राष्ट्रीय संघांच्या
कामगिरीच्या आधारावर संघांची निवड करण्यात येईल.
भारताच्या राष्ट्रीय संघाने सर्वोत्तम कामगिरी २०१५ मध्ये ३ मिनिट २९.०८ सेकंद (जिश्ना मॅथ्यू, टिंटू लुका, देबश्री मुजुमदार व पूवम्मा) बीजिंग विश्वचॅम्पियनशिपमध्ये नोंदवली होती. शनिवारी भारतीय संघाने
(३ मिनिट ३१.३९ सेकंद) नोंदवलेल्या कामगिरीचा विचार करता विश्व
रिले रँकिंगमध्ये भारतीय संघ १५
व्या स्थानी आहे. रिले रँकिंग
रिओ आॅलिम्पिकसाठी तयार
करण्यात आली आहे. त्याची सरासरी
वेळ ३ मिनिट ३०.२४ सेकंद अशी आहे.
रशियन महासंघावर सध्या आयएएएफने डोपिंग प्रकरणामुळे बंदी घातली आहे. त्यांना पुनरागमन करण्याची संधी आहे. रशियन संघ (३ मिनिट २४.२९ सेकंद) सरस सरासरीच्या आधारावर भारताला एका स्थानाने पिछाडीवर ढकलू शकतो. जर्मनी संघ १६ व्या स्थानी होता. भारताने शनिवारी रात्री अव्वल १६ मध्ये स्थान मिळवल्यामुळे जर्मनी संघाची घसरण झाली आहे.
जर्मनी संघाकडे मायदेशात आणि शेजारी राष्ट्रांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये चांगली संधी आहे. भारतीय संघ आता युरोपमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सातत्याने सहभागी होणार असून त्यांना कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. त्यांना अव्वल १६ मधील
स्थान कायम राखावे लागणार आहे. कारण अव्वल १६ संघांना आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
(वृत्तसंस्था)