सिडनीमध्ये भावनिक कसोटी

By admin | Published: January 2, 2015 02:11 AM2015-01-02T02:11:57+5:302015-01-02T02:11:57+5:30

दुखापतीमुळे फिलिफ ह्युजला गमाविणारा आॅस्ट्रेलियन क्रिकेट संघ या मैदानावर मालिकेतील अखेरचा कसोटी खेळण्यासाठी दाखल होतील, त्यावेळी भावना उचंबळून आल्याचे चित्र दिसेल.

An emotional test in Sydney | सिडनीमध्ये भावनिक कसोटी

सिडनीमध्ये भावनिक कसोटी

Next

सिडनी : आॅस्ट्रेलियाने मालिकेत विजयी आघाडी घेतली असली तरी भारतीय कर्णधार कर्णधार महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती आणि सिडनी मैदानावर सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे फिलिफ ह्युजला गमाविणारा आॅस्ट्रेलियन क्रिकेट संघ या मैदानावर मालिकेतील अखेरचा कसोटी खेळण्यासाठी दाखल होतील, त्यावेळी भावना उचंबळून आल्याचे चित्र दिसेल.
आॅस्ट्रेलिया आणि भारत यांच्यासाठी जय-पराजचाचा विचार करता सिडनी कसोटी सामन्याला विशेष महत्त्व नाही, पण उभय संघांसाठी हा मात्र भावुक करणार कसोटी सामना ठरणार आहे.
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मेलबोर्न कसोटी सामना अनिर्णित संपल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाचे नेतृत्व आता युवा विराट कोहली करणार आहे. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या सारख्या अनुभवी खेळाडूंनंतर ३३ वर्षीय धोनी संघाचा सर्वांत अनुभवी खेळाडू व सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यशाचे नवे शिखर गाठले आहे. कसोटी क्रिकेटमधून धोनीच्या निवृत्तीनंतर २६ वर्षीय विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे. युवा कर्णधार व युवा संघ आॅस्ट्रेलियात धोनीच्या कसोटी कारकीर्दीला या अखेरच्या सामन्यात विजयाची ‘गिफ्ट’ देण्यास उत्सुक आहे.
केवळ कसोटी क्रिकेटच नाही तर धोनी क्रिकेटच्या प्रत्येक स्वरुपात भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विदेशात भारतीय संघ अपयशी ठरत असल्यामुळे धोनीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले. या मालिकेत भारतीय संघाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. मेलबोर्न कसोटी सामना अनिर्णित राखताना भारतीय संघ आॅस्ट्रेलियाची विजयाची मालिका खंडित करण्यात यशस्वी ठरला, त्याचे सर्व श्रेय धोनीच्या नाबाद २४ धावांच्या खेळीला जाते. त्याने संयमी फलंदाजी करीत सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विराट, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, लोकेश राहुल यांच्यासारख्या कसोटी क्रिकेटचा विशेष अनुभव नसलेल्या खेळाडूंवर एकाएकी मोठी जबाबदारी आली आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर त्यांच्यापुढे विजयासह पुढे वाटचाल करण्याचे आव्हान राहणार आहे.
आॅस्ट्रेलियन संघातील या चार खेळाडूंसाठी या मैदानावर खेळणे भावनिक क्षण ठरणार आहे. आस्ट्रेलियाने यापूर्वी भारताविरुद्धच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. संघाचे प्रशिक्षक
डॅरेन लेहमन यांच्या मते सिडनी
कसोटी सामना भावुक क्षण ठरणार आहे. (वृत्तसंस्था)

४दुसऱ्या बाजूचा विचार करता संघसहकारी फिल ह्युजचा सिडनी मैदानावर सामन्यादरम्यान डोक्यावर बाऊंसर आदळल्यामुळे झालेल्या मृत्यूनंतर आॅस्ट्रेलियन संघ प्रथमच या मैदानावर कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. ह्युजच्या अपघाती निधनामुळे या मालिकेच्या कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला. या घटनेनंतर आॅस्ट्रेलियन संघ भावुक झाला होता आणि ह्युजच्या निधनामुळे आॅस्ट्रेलियातील वातावरण शोकाकुल होते.
४या दु:खद घटनेनंतर यजमान संघासाठी सिडनी मैदानावर खेळणे म्हणजे भावनिक क्षणांना पुन्हा उजाळा मिळणार आहे. यजमान संघ या मैदानावर विजय मिळवित ह्युजला श्रद्धांजनी अर्पण करण्यास प्रयत्नशील आहे.
४फिल ह्युज जीवनातील अखेरच्या डावात फलंदाजी करीत
असताना आॅस्ट्रेलिया संघातील ब्रॅड हॅडिन, नॅथन लियोन, शेन वॉटसन आणि डेव्हिड वॉर्नर मैदानावर क्षेत्ररक्षण करीत
होते. सिडनी मैदानावर सामनान्यादरम्यान वेगवान गोलंदाज सीन एबोटचा बाऊंसर ह्युजच्या डोक्यावर आदळला आणि दोन दिवसानंतर ह्युजने जगाचा
निरोप घेतला.

Web Title: An emotional test in Sydney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.