Emotional : ... म्हणून कॅप्टन कूल अनुपने निवृत्तीसाठी निवडला हा दिवस!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 04:04 PM2018-12-20T16:04:14+5:302018-12-20T16:06:43+5:30
अनुप कुमारने प्रो कबड्डी लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
मुंबईः अनुप कुमारने प्रो कबड्डी लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. खेळाडूच्या आयुष्यात यशापयश येतच राहतात, पण तो माघार घेत नाही. कबड्डीत अनेकांचा आदर्श असलेल्या अनुपही तसाच लढवय्या, परंतु यावेळी त्याने घेतलेला निर्णय पचनी पडलेला नाही. प्रो कबड्डी लीगच्या 2018च्या मोसमात अनुपला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जयपूरसोबतच्या अखेरच्या सामन्यानंतर त्याला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेत मैदानाला प्रदक्षिणा घातली.
The last ride together! 😢 @IamAnupK#ThankYouAnup#VivoProKabaddi#JAIvGUJpic.twitter.com/cGWNMH0tdj
— ProKabaddi (@ProKabaddi) December 20, 2018
यंदाच्या मोसमात त्याने 13 सामन्यांत 50 गुणांची कमाई केली. त्याच्या नेतृत्वाखाली जयपूरला 14 पैकी 4 सामने जिंकता आले. अनुपने प्रो कबड्डी लीगमध्ये 91 सामन्यांत 596 गुणांची कमाई केली आहे. सर्वाधिक गुण कमावणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सहाव्या स्थानी आहे. त्याने एक भावनिक व्हिडीओ पोस्ट करून ही निवृत्ती जाहीर केली. त्यात त्याने निवृत्तीसाठी 19 डिसेंबरची निवड का केली, यामागचं कारण सांगितल.
A man who left an unmatchable, everlasting legacy on the mat bids the game goodbye today.
— Jaipur Pink Panthers (@JaipurPanthers) December 19, 2018
Thank you captain cool, @IamAnupK, for all that you've done for the game both on and off the mat! #RoarForPanthers#JaiHanumanpic.twitter.com/VK9Nn0DC21
तो म्हणाला, ''मैदानावर अनुप अनुप हा नारा खुप मिस करणार. निवृत्तीसाठी मी आजचाच दिवस का निवडला, हे सांगायचे आहे. 19 डिसेंबर हा माझ्या मुलाचा वाढदिवस आणि यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. या खेळ आता युवकांचा आहे आणि त्यामुळे मला येथेच थांबायला हवं. इतकी वर्ष भरभरून प्रेम देणाऱ्या चाहत्यांचे आभार.''
2006 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. दक्षिण आशियाई स्पर्धेत त्याने भारतीय संघात पदार्पण केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2016 मध्ये विश्वचषक उंचावला. 2012 मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. निवृत्तीनंतर काय करणार, या प्रश्नावर त्याने सस्पेन ठेवला आहे. त्याने चाहत्यांना लवकरच नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे कबुल केले.