अडवाणीचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: November 29, 2014 01:11 AM2014-11-29T01:11:34+5:302014-11-29T01:11:34+5:30
चीनचा 14 वर्षीय प्रतिभावान खेळाडू यान बिंगताओने धक्कादायक निकाल नोंदविताना भारताच्या पंकज अडवाणीचा शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 6-4 ने पराभव केला
Next
आयबीएसएफ विश्व स्नूकर चॅम्पियनशिप :
14 वर्षाच्या यान बिंगताओने नोंदविला धक्कादायक निकाल
बेंगळुरू : चीनचा 14 वर्षीय प्रतिभावान खेळाडू यान बिंगताओने धक्कादायक निकाल नोंदविताना भारताच्या पंकज अडवाणीचा शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 6-4 ने पराभव केला आणि आयबीएसएफ विश्व चॅम्पियनशिपमध्ये गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.
पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद सज्जदने भारताच्या मनन चंद्राचा 6-1 ने पराभव केल्यामुळे या स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले. चीनचा 2क्13 चा उपविजेता झाओ शिनतोंगने ऑस्ट्रेलियाच्या अॅड्रियन रिडलेवर 6-4 ने मात केली. थायलंडच्या ाितसानोत लेर्तसात्याथोर्नने आमिर सरखोशचा 6-4 ने पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
महिला विभागात चित्र मागीमेराजच्या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले. चित्रला बेल्जियमच्या वेंडी जेंसविरुद्ध
4-1 ने पराभव स्वीकारावा लागला. वेंडीने या लढतीत 51-38, 22-66, 88-1, 67-11, 61-52 ने सरशी साधली.
14 वर्षीय बिंगताओने लक्ष उपांत्य फेरीच्या लढतीवर केंद्रित केले होते. ¨बगताओने अडवाणीचा 38-63, 47-75, 1क्7-क्, 68-1क्, 6क्-16, 4-83, 89-24, 4क्-67, 71-26, 59-4क् ने पराभव केला. सज्जदने मनन चंद्रावर 8क्-2क्, 68-39, 85-19, 59-18, 44-77, 8क्-32, 7क्-27 ने मात करीत उपांत्य फेरी गाठली. दरम्यान, मास्टर्स विभागात भारताच्या श्रीनिवास मूर्तीला वेल्सच्या डॅरेन मॉर्गनविरुद्ध 4-क् ने पराभव स्वीकारावा लागला. थायलंडच्या चुकार्ट ट्रेराथानाप्रादितने भारताच्या रफत हबीबची झुंज 4-3 ने मोडून काढत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. (वृत्तसंस्था)
सभागृहात गोंधळ असल्यामुळे एकाग्रता साधता आली नाही. माझी कामगिरीही लौकिकाला साजेशी नव्हती. बिंगताओने चांगला खेळ केला नसला तरी मी त्याच्या विजयाचे श्रेय हिसकावणार नाही. बिंगताओने मोक्याच्या क्षणी चांगला खेळ केला तर माझी कामगिरी मात्र ढेपाळली.
- पंकज अडवाणी