राष्ट्रकुल स्पर्धेचा शेवट शानदार करायचा आहे - सीमा पूनिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 05:42 AM2018-03-23T05:42:01+5:302018-03-23T05:42:01+5:30
सीमा पुनिया ही डोपिंगमुळे चर्चेत राहिली आहे; परंतु पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंत ती पदकांची सर्वोत्तम दावेदार आहे आणि थाळीफेकमध्ये या स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीची शानदार अखेर करण्यास ती कटिबद्ध आहे.
नवी दिल्ली : सीमा पुनिया ही डोपिंगमुळे चर्चेत राहिली आहे; परंतु पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंत ती पदकांची सर्वोत्तम दावेदार आहे आणि थाळीफेकमध्ये या स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीची शानदार अखेर करण्यास ती कटिबद्ध आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात सीमा ही भारताची सर्वात यशस्वी अॅथलिट म्हणून गणली जाते. तिने जेव्हा-जेव्हा या स्पर्धेत सहभाग घेतला तेव्हा तिने पदक जिंकले आहे. सीमाने सर्वात आधी मेलबर्न २00६ मध्ये सहभाग घेतला तेव्हा रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर तिने २0१0 आणि २0१४ मध्येदेखील पदकांची कमाई केली. आता ती ३४ वर्षांची आहे आणि असे असले तरी ती गोल्डकोस्टमध्ये होणाºया स्पर्धेत पदक जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे.
सीमाने तिच्या कारकीर्दीत आतापर्यंत तीन आॅलिम्पिक (२0१४, २0१२ आणि २0१६), एक आशियाई स्पर्धा (२0१४) आणि तीन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत सहभाग नोंदवला आहे. तिचे लक्ष आता २0२0 च्या आॅलिम्पिककडेही लागून राहिले आहे.
सीमा सध्या अमेरिकेत सराव करीत आहे. ती म्हणाली, ‘ही माझी चौथी राष्ट्रकुल स्पर्धा असेल आणि मी गोल्डकोस्टमध्ये पदक जिंकू शकते याचा मला पूर्ण विश्वास आहे. तथापि, पदकाचा रंग कोणता असेल हे मी सांगू शकत नाही. हा माझ्यासाठी प्रदीर्घ प्रवास आहे. २0२0 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकेल की नाही हे मला माहीत नाही; परंतु मी २0२0 आॅलिम्पिकपर्यंत खेळात असणार आहे. माझी कारकीर्द अद्याप संपलेली नाही.’(वृत्तसंस्था)
२0२0 आॅलिम्पिकमध्ये चांगल्या कामगिरीचा विश्वास..!
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील खेवडा येथे जन्म झालेल्या सीमा हिने ११ व्या वर्षीच अॅथलेटिक्समध्ये प्रवेश केला होता. तिने वयाच्या १७ व्या वर्षी विश्व ज्युनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये थाळीफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते; परंतु डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे तिचे हे पदक हिसकावून घेण्यात आले होते.’ सर्दी-खोकल्याच्या उपचारासाठी सीमाने स्युडोफेडरिन सेवन केले होते.
तेव्हा आयएएएफच्या नियमानुसार तिला ताकीद देऊन सोडण्यात आले. आॅलिम्पिक २0१२ आणि २0१६ मध्ये ती पात्रता फेरीमध्येच बाद झाली. त्याची खंत तिच्या मनात आजही घर करून आहे. ती म्हणाली, ‘मला माझ्या कारकीर्दीविषयी विशेष खंत नाही; परंतु आॅलिम्पिकमधील अपयश हे मला अजूनही जिव्हारी लागले आहे. त्यामुळे मी २0२0 आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊन तेथे चांगली कामगिरी करू इच्छिते.’