अजय जयरामचे आव्हान संपुष्टात

By admin | Published: July 11, 2016 03:54 AM2016-07-11T03:54:20+5:302016-07-11T03:54:20+5:30

भारताच्या अजय जयरामला पुरुष एकेरीत जपानच्या कैंटा सुनियामाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे अमेरिकन ओपन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

Ending Ajay Jayaram's Challenge | अजय जयरामचे आव्हान संपुष्टात

अजय जयरामचे आव्हान संपुष्टात

Next


अल मोंटे : भारताच्या अजय जयरामला पुरुष एकेरीत जपानच्या कैंटा सुनियामाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे अमेरिकन ओपन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
लॉस एंजिल्स बॅडमिंटन क्लबमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत २२ व्या व या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या जयरामला आपल्या कामगिरी सातत्य राखता न आल्यामुळे सुनियामाकडून ३७ मिनिटांत १०-२१, १४-२१ गुणांनी पराभव पत्करावा लागला. सुनियामाने सुरुवातीला ४-२ अशी आघाडी घेतली होती. नंतर जयरामने त्याला चांगली झुंज देत ८-७ अशी गुणसंख्या केली. हा बरोबरीचा खेळ १०-१० गुणांपर्यंत चालला होता. नंतर सुनियामाने जोरदार खेळाचे प्रदर्शन करून दहा गुण संपादन करून पहिली गेम २१-१० अशी जिंकली. दुसऱ्या गेममध्ये जयरामने सुरुवातीला चांगला खेळ करीत ३-१ अशी अवघ्या दोन गुणांची आघाडी घेतली. नंतर सुनियामाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आघाडी घेतली. ही आघाडी सुनियामाने कायम ठेवत १४-१४ अशी गुण बरोबरी केली. त्यानंतर जपानाच्या सुनियामाने सलग सात गुण वसूल करून गेम आपल्या नावे करीत विजय नोेंदविला. (वृत्तसंस्था)

Web Title: Ending Ajay Jayaram's Challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.