सायनाचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: August 14, 2016 07:11 PM2016-08-14T19:11:40+5:302016-08-14T21:23:08+5:30
रिओ - ऑलिंपिकमध्ये भारताच्या सायना नेहवालचे आव्हान दुसर्या फेरीत संपुष्टात आले.
सायनाने काही चांगले शॉट खेळून पुन्हा एकदा ११-९ अशी आघाडी घेतली. मात्र मारियाने जोरदार लढत देऊन १३-१३ अशी बरोबरी साधली. यूक्रेनच्या खेळाडूने १९-१७ अशी आघाडी घेतली आणि ही आघाडी कायम राखत पहिला सेट २१-१८ असा जिंकला.
मारियाने दुसऱ्या सेटची सुरुवात जोरदार करत पहिला अंक मिळवला. परंतु सायनाने जोरदार प्रत्युत्तर देत सलग चार अंक मिळवले आणि सेटमध्ये ४-१ अशी आघाडी घेतली. मारियाने पुन्हा एकदा सामन्यात परतत ४-४ अशी बरोबरी केली.
सायनाने पुन्हा ७-६ अशी आघाडी घेतली. परंतु नेटवर शॉट मारून सायनाने अंक गमावला आणि मारियाला आघाडी घेण्याची संधी दिली. २ अंकांनी यूक्रेनची खेळाडू पुढे असताना सायनाने पुन्हा ९-९ अशी बरोबरी केली.
सायनाने पुन्हा आघाडी घेत स्कोर १२-१० असा बरोबरीत आणला. सामन्याच्या शेवटच्या क्षणी दोन्ही खेळाडूंनी आक्रमक शॉट खेळले. परंतु शेवटी मारियाने हा सेटही १९ विरुद्ध २१ अंकांनी जिंकला.