रामकुमारचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: January 9, 2016 03:21 AM2016-01-09T03:21:50+5:302016-01-09T03:21:50+5:30
गत दोन वेळचा विजेता आणि अग्रमानांकित स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने पुरुष एकेरीत पाचव्या मानांकित स्पेनच्या गुईलेर्मो लोपेजचा सरळ दोन
चेन्नई : गत दोन वेळचा विजेता आणि अग्रमानांकित स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने पुरुष एकेरीत पाचव्या मानांकित स्पेनच्या गुईलेर्मो लोपेजचा सरळ दोन सेटमध्ये ६-४, ६-४ गुणांनी पराभव करून चेन्नई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे भारताच्या रामकुमार रामनाथनला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
वाइल्ड कार्डधारक रामकुमारने धक्कादायक विजयाची नोंद करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. रामकुमारने पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकला होता. परंतु, त्याचा प्रतिस्पर्धी ब्रिटनचा एल्जाज बेदेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून पुढील दोन सेट जिंकून रामकुमारचे आव्हान संपुष्टात आणले. दोन तास १८ मिनिटे चाललेल्या लढतीत बेदेने रामकुमारला ६-७, ६-४, ६-३ असे पराभूत करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)