इंग्लंड-श्रीलंका तिसरी कसोटी अखेर अनिर्णीत
By admin | Published: June 14, 2016 04:04 AM2016-06-14T04:04:07+5:302016-06-14T04:04:07+5:30
पावसाचा व्यत्यय आलेल्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाचा अडथळा आल्यामुळे
लंडन : पावसाचा व्यत्यय आलेल्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाचा अडथळा आल्यामुळे फक्त १२.२ षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यात श्रीलंकेने दुसऱ्या डावात २४.२ षटकांत १ बाद ७८ धावा केल्या होत्या. तीन सामन्यांची ही कसोटी मालिका इंग्लंडने याआधीच २-0 अशी जिंकली आहे.
इंग्लंडने विजयासाठी ३६२ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने बिनबाद ३२ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी उपाहारापर्यंत खेळ होऊ शकला नव्हता आणि त्यानंतर खेळ सुरू झाला तेव्हा धावसंख्या ४५ वर असताना त्यांनी कौशल सिल्वाच्या रूपाने पहिला फलंदाज गमावला. त्याआधी इंग्लंडने त्यांचा दुसरा डाव ७१ षटकांत ७ बाद २३३ या धावसंख्येवर घोषित करताना श्रीलंकेला ३६२ धावांचे लक्ष्य दिले होते.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड (पहिला डाव) : ४१६ व दुसरा डाव ७ बाद २३३ (घोषित).
श्रीलंका (पहिला डाव) : २८८ व दुसरा डाव २४.२ षटकांत १ बाद ७८. (करुणारत्ने नाबाद ३७, सिल्वा १६, मेंडिस नाबाद १७. अँडरसन १/२७).