इंग्लंडने न्यूझीलंडला नमविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 04:16 AM2016-03-13T04:16:25+5:302016-03-13T04:16:25+5:30

इंग्लंडने विश्वचषक टी-२० स्पर्धेतील आपल्या पहिल्या सराव सामन्यात अखेरच्या षटकात बाजी मारताना न्यूझीलंडला ६ विकेटनी नमविले. जेसन रॉय आणि अ‍ॅलेक्स हेल्स या सलामीवीरांनी

England beat New Zealand | इंग्लंडने न्यूझीलंडला नमविले

इंग्लंडने न्यूझीलंडला नमविले

Next

मुंबई : इंग्लंडने विश्वचषक टी-२० स्पर्धेतील आपल्या पहिल्या सराव सामन्यात अखेरच्या षटकात बाजी मारताना न्यूझीलंडला ६ विकेटनी नमविले. जेसन रॉय आणि अ‍ॅलेक्स हेल्स या सलामीवीरांनी केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर इंग्लंडने शानदार विजय मिळविला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ८ बाद १६९ अशी आव्हानात्मक मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १९.२ षटकांत १७० धावा काढल्या. रॉय आणि हेल्स यांनी ८.२ षटकांतच ७७ धावांची वेगवान भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. मिचेल सॅटनरने रॉयला बाद करून ही जोडी फोडली. रॉयने ३६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा कुटल्या. यानंतर हेल्सने आक्रमणाची सूत्रे घेताना संघाला विजयी मार्गावर आणले. हेल्स ३६ चेंडूंत ५ चौकारांसह ४४ धावा काढून बाद झाला. नॅथन मॅक्युलमने हेल्सचा अडसर दूर केल्यानंतर न्यूझीलंडचा डाव ४ बाद १४८ असा घसरला. मात्र, अंतिम क्षणी जोश बटलरने ९ चेंडूंत ३ चौकार व एका षटकाराच्या साह्याने नाबाद २४ धावांचा तडाखा देऊन संघाला विजयी केले. सॅनटर आणि मॅक्युलम यांनी प्रत्येकी २ बळी घेऊन इंग्लंडला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. तत्पूर्वी, कर्णधार केन विल्यम्सनने ३९ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह दिलेल्या ६३ धावांच्या आक्रमक तडाख्याच्या जोरावर किवी संघाने ८ बाद १६९ धावांची मजल मारली. विल्यम्सनचा अपवाद वगळता न्यूझीलंडचे इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही. फिरकीपटूंपुढे चाचपडत खेळल्याने न्यूझीलंडच्या धावसंख्येला ब्रेक लागला. आदिल रशीद (३/१५) आणि रिसे टोपले (२/३९) यांनी अचूक मारा करताना न्यूझीलंडचा डाव मर्यादित राखला. संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १६९ धावा (केन विल्यम्सन ६३, रॉस टेलर नाबाद १९; आदिल रशीद ३/१५, रिस टोपले २/३९) पराभूत वि. इंग्लंड : १९.२ षटकांत ४ बाद १७० धावा (जेसन रॉय ५५, अ‍ॅलेक्स हेल्स ४४; मिचेल सॅनटर २/२४, नॅथन मॅक्युलम २/२५).

Web Title: England beat New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.